पिढी घडविण्याची शिक्षकांवर जबाबदारी

By Admin | Updated: July 23, 2014 23:49 IST2014-07-23T23:49:33+5:302014-07-23T23:49:33+5:30

इतिहासात काही थोर व्यक्तींनी शिक्षण कमी घेतले; परंतु शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वदूर पोहोचविण्याचे महान कार्य त्यांनी केले.

Responsibility for teachers to make generation | पिढी घडविण्याची शिक्षकांवर जबाबदारी

पिढी घडविण्याची शिक्षकांवर जबाबदारी

हडपसर : इतिहासात काही थोर व्यक्तींनी शिक्षण कमी घेतले; परंतु शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वदूर पोहोचविण्याचे महान कार्य त्यांनी केले. आता गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेचे दिवस आहेत. येथे अॅडमिशन असो वा नोकरी मेरिट पाहूनच विद्याथ्र्याचे काम होते. त्यामुळे आजही शिक्षणात  भावी पिढी आणि समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
प्रभाग क्रमांक 61 वानवडी येथे पालिकेच्या श्रीमंत महादजी ¨शंदे इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि नगरसेवक प्रशांत जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस वानवडी विभागाच्या वतीने 1क् वी-12 वीतील गुणवंत विद्याथ्र्याचे सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, दहा हजार वह्यांचे वाटपही कार्यक्रमस्थळी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
महापौर चंचला कोद्रे, स्थायी समिती अध्यक्ष बापूसाहेब कण्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, म्हाडा अध्यक्ष अंकुश काकडे, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, म. वि. अकोलकर, नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेविका नंदा लोणकर, नुरुद्दीन अली सोमजी, माजी महापौर वैशाली बनकर, तसेच पालिकेच्या शाळा क्रमांक 62 मधील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
राज्य शासन सर्वाधिक निधी हा शिक्षणासाठी उपलब्ध करीत आहे. त्याचा योग्य विनियोग करण्याचे काम शिक्षकांसह संबंधित शिक्षणक्षेत्रत काम करणा:या वेगवेगळ्या घटकांनी करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा या वेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. 
 सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर नगरसेविका नंदा लोणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
 
शिक्षकांना सूचना
4पवार म्हणाले, की जिल्हा परिषद आणि पालिकेच्या शाळांच्या दर्जाबाबत सातत्याने बोलले जाते. त्यासाठी येथील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही अद्ययावत अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करीत आहे. त्याकडे पदाधिका:यांनी आणि शिक्षकांनी जातीने लक्ष देण्याच्या सूचनाही या वेळी पवार यांनी दिल्या. 

 

Web Title: Responsibility for teachers to make generation