Pune Crime: सासरकडून वारंवार पैशांची मागणी; त्रासाला कंटाळून महिला सरपंचाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:33 IST2026-01-26T11:37:32+5:302026-01-27T10:33:32+5:30

Pune Uruli Kanchan Dowry Harassment: विवाहाच्या वेळी पन्नास तोळे सोन्याचे दागिने, रोकड दिली होती. हुंडा दिल्यानंतरही तिला त्रास देण्यात येत होता

Repeated demands for money from father-in-law; Tired of the harassment, the daughter-in-law of a female sarpanch took extreme steps | Pune Crime: सासरकडून वारंवार पैशांची मागणी; त्रासाला कंटाळून महिला सरपंचाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

Pune Crime: सासरकडून वारंवार पैशांची मागणी; त्रासाला कंटाळून महिला सरपंचाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचाच्या सुनेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरपंच महिलेसह चौघांविरुद्ध ऊरळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीप्ती रोहन चौधरी (Dipti Rohan Chaudhari) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीप्तीच्या आईने ऊरळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडीतील कड वस्ती परिसरात महिला सरपंच राहायला आहे. शनिवारी (दि. २४) सायंकाळी दीप्ती चौधरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरकडील मंडळींकडून सुरू झाली होती. वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरू होता. आरोपींनी दीप्तीला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते, असेही दीप्तीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. विवाहाच्या वेळी पन्नास तोळे सोन्याचे दागिने, रोकड दिली होती. हुंडा दिल्यानंतर तिला त्रास देण्यात येत होता. मानसिक दबाव आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर दीप्तीने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: दहेज उत्पीड़न से तंग आकर सरपंच की बहू ने की आत्महत्या

Web Summary : पुणे में सरपंच की बहू ने कथित तौर पर दहेज उत्पीड़न से तंग आकर आत्महत्या कर ली। पुलिस ने सरपंच सहित चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। पीड़िता को लगातार पैसे की मांग के बाद गर्भपात कराने के लिए मजबूर किया गया था।

Web Title : Dowry Harassment Drives Sarpanch's Daughter-in-Law to Suicide in Pune

Web Summary : A woman in Pune, daughter-in-law of a village head, died by suicide due to alleged dowry harassment. Police have registered a case against four people, including the village head. The victim was reportedly forced to undergo an abortion after continuous demands for money.