शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:24 IST

भाडे करारनामा कुठं बनवला आहे. परवाना मिळावा म्हणून अजून काही गुन्हे केले आहेत का? कागदपत्र दिले ते खरे आहेत का? सर्व गोष्टींचा तपास करायचा आहे

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला १४ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. खोटे कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्या प्रकरणी शशांक हगवणे याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

तपास अधिकारी

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज दाखल करताना खोटे कागदपत्र दाखल केले आहेत. भाडे करार जो सादर केला होता तो देखील बनावट आहे. यात इतरांनी कुणी मदत केली आहे का? त्याचा तपास करायचा आहे. जिथला पत्ता त्याने दिला तिथ त्याच्यासोबत अजून कुणी राहत होत का? जो शस्त्र परवाना मिळवला आहे त्या शस्त्राने कुणाला धमकवला आहे का? याचा तपास करायचा आहे? सदर ठिकाणी राहून काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. म्हणून १३ दिवस पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती.  

सरकारी वकील

भाडे करारनामा कुठं बनवला आहे. परवाना मिळावा म्हणून अजून काही गुन्हे केले आहेत का? अजून कुठले कागदपत्र दाखल केले होते जे खोटे होते याचा तपास करायचा आहे? कागदपत्र दिले ते खरे आहेत का? याचा तपास करायचा आहे. 

आरोपीचे वकील

आमच्याकडे आम्ही राहत असलेलं रजिस्टर डॉक्युमेंट आहे. कुठलेही कागदपते खोटी दिले नाहीत. भाडे करार आहे. रेंट अग्रिमेंट केलं आहे. घरमालकाची देखील तक्रार नाही. सगळे कागदपत्र चेक करून परवाना दिला होता. खोटी कागदपत्र असताना परवाना दिला असेल तर पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. सगळे कागदपत्र खरे आहेत तेच तपासून परवाना दिला होता. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय