याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 08:17 PM2020-03-30T20:17:48+5:302020-03-30T20:27:30+5:30

निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे.

Remember! Confusion about Corona due to 'April Fool'; Police will take action | याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

googlenewsNext

पुणे : १ एप्रिलला अनेक जण आपल्या परिचितांना एप्रिल फुल करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, यंदा कोरोना विषाणूचे संकट जगावर आले आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केलेले मेसेज एप्रिल फुल म्हणून टाकू नये, नाहीतर त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. लॉक डाऊनमुळे देशातील सर्व लोक घरात बसून आहेत. कोरोना विषाणू संकट, संचारबंदी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतील, अशा प्रकारे मेसेज टाकू नये. अशा मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही. प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. याकडे लक्ष द्यावे़ जर अशा स्वरुपाचे मेसेज आपल्याकडून सोशल मिडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणार्‍यास व त्या ग्रुप अ‍ॅडमिनला कलम ६८ नुसार पोलीस प्रतिबंध करीत आहेत. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४०, तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी कळविले आहे.

ग्रुप अ‍ॅडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात तसेच सेटींगमध्ये जाऊन ग्रुप अ‍ॅडमिन मेसेज सेंड करील असे सेंटिग करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

Web Title: Remember! Confusion about Corona due to 'April Fool'; Police will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.