The 'Reflective Caller' - a life save from accident by dogs | श्वानांपासूनच्या अपघातांवरची प्राणरक्षक ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’.... 
श्वानांपासूनच्या अपघातांवरची प्राणरक्षक ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’.... 

ठळक मुद्देअपघात रोखण्यास प्रभावी उपाय : तरुणाईचा स्तुत्य उपक्रम  लव्ह केअर फाउंडेशन आणि व्हाईस फॉर द व्हाईसलेस अ‍ॅनिमल ग्रुपचा ''डॉग कॅम्पेन''

दीपक कुलकर्णी- 
पुणे : रस्त्यावरच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यात कुणाला जीव गमवावा लागतो तर कुणी गंभीर जखमी होते..पण एक आपल्या जमेची बाजू म्हणजे आपल्यावर उपचार करता येतात. तसे आपण काही नियमांचे पालन केले तर अपघातांच्या संख्येवर नियंत्रण मिळवू शकतो. परंतु, कधी शहरात तर कधी महामार्गावरील अपघातात मुक्या प्राण्यांचा होणाऱ्या मृत्यूची संख्या पण लक्षणीय आहे. यात रात्रीच्या वेळी होणारे अपघात जास्त आहे. यात भटक्या श्वानांमुळेही बरेच अपघात घडतात. त्यामुळे या श्वानांपासून घडणाऱ्या अपघातातून वाचण्यासाठी काही तरुण पुढे आले आहे . त्यांनी केलेला एक अफलातून प्रयोगामुळे कुत्र्यांमुळे होणारे अपघात आणि त्यांचा मृत्यू यातून बचाव होण्यास निश्चित मदत होणार आहे. 
 शहर आणि महामार्ग रस्त्यांवरती श्वानांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे. परंतु त्यावर संपूर्ण दिवस फक्त चर्चा होते त्यात अपघातातील व्यक्ती विषयी सहानुभूती आणि श्वानांविषयी तिरस्काराची भावना व्यक्त करून दिवस मावळला की घडलेला प्रसंग विसरून जातो..पण रात्रीच्या वेळेस भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेमुळे जेव्हा एखाद्या कुत्र्याचा जीव जातो किंवा तो जखमी होतो तेव्हा त्याला समाज किती गांभीर्याने घेतो..? पण लव्ह केअर फाउंडेशन आणि व्हाईस फॉर द व्हाईसलेस अ‍ॅनिमल ग्रुप च्या माध्यमातून ''डॉग कॅम्पेन'' च्या नावाखाली एक स्तुत्य उपक्रम शहर परिसर आणि महामार्गावर राबविला जात आहे. त्यातून आत्तापर्यंत अनेक कुत्र्यांचा जीव तर वाचला आणि अपघातांची संख्या कमी होण्यास देखील मदत होत आहे.  
   'फ्रेंडशिप डे ' च्या दिवशी काही मित्र एकत्र आले त्यांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष फक्त पाच दिवस ५० रुपयांचे योगदान मागितले होते. त्या आवाहनाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि देशभरातून जवळपास ३०, ००० रुपये जमा झाले..यातून ५०० रिफ्लेक्टिव्ह एलईडी कॉलर तयार केल्या आहेत. त्यामुळे अंधारात वाहन चालवणाऱ्या माणसाला समोर काहीतरी असल्याची जाणीव होईल. आणि गाडीचा ब्रेक नियंत्रित करण्यासंबंधी पावले टाकून अपघात टाळतायेईल.खांद्यावरच्या बॅगेसारखी मानेच्या साईजप्रमाणे कमी जास्त अशी अ‍ॅडजस्ट करता येणे ही या ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर ‘ची खासियत आहे. ज्यातून त्या कुत्र्याची ओळख तयार होते. एका रिफ्लेक्टिव्ह कॉलरचा साधारण खर्च ४० रुपये आहे. पहिल्या टप्प्यांत २५० कॉलर तयार करण्यात आल्या होत्या, त्या शहरातील वानवडी, हडपसर गाडीतळ, आगाखान पॅलेस, एनआयबीएम रस्ता, तळजाई, सातारा रस्ता, कात्रज परिसरात ही मोहीम हाती घेतलेली आहे. येत्या काही दिवसात पुणे- बेंगलोर महामार्गावर मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या मोहिमेबाबत पियुष शहा हा तरुण म्हणाला, श्वानांसाठीचे रिफ्लेक्टर कॉलर आम्ही इंदोरहून मागवले आहे.तसेच या कॉलर बारामाही उत्तमप्रकारे कार्यरत राहणाऱ्या आहेत. कुत्र्याच्या गळ्यात त्या बांधल्यामुळे नक्कीच त्यांच्यापासून होणाऱ्या अपघातात घट होण्यास मदत  होईल.श्वानांना रिफ्लेक्टर कॉलर बांधल्यानंतर एक ओळखपत्र तयार केले जाते. ज्यात त्या कुत्र्याचे लसीकरण, आजार अशी आरोग्याशी निगडित माहिती नोंदवलेली असते.

* कोट 
 माझ्या मामाचा कुत्र्याला वाचवाण्याच्या नादात अपघात होऊन ते दुभाजकाला धडकले होते. त्यात त्यांचा ब्रेन डेड झाला होता. तेव्हापासून कुत्र्यांपासून होणाºया अपघातासाठी काही काम करण्याचा मनोदय होता..परंतु या फ्रेंडशिप डे ला या उपक्रमाची सुरुवात झाली. अवघ्या पाच दिवसांत ५० रुपयांच्या योगदानातून तीस हजार रुपये जमा झाले.. कुणी मदत घेताना एक ऑनलाईन फॉर्म भरून घेतला. त्यात या उपक्रमाची दिवसागणिक सविस्तर माहिती त्या सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला देत आहोत. जमा झालेल्या रकमेतून ५०० रिफ्लेक्टर कॉलर तयार केल्या असून शहरात आणि महामार्गावर ही मोहीम अधिक व्यापकपणे राबविली जाणार आहे...- पियुष शहा, लव्ह केअर फाउंडेशन 

Web Title: The 'Reflective Caller' - a life save from accident by dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.