लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र गुर्जर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:33+5:302021-02-05T05:02:33+5:30

पुणे : तिसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर यांची एकमताने निवड केली आहे. अखिल भारतीय मराठी ...

Ravindra Gurjar as the President of the Writer-Publisher Literary Convention | लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र गुर्जर

लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र गुर्जर

पुणे : तिसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर यांची एकमताने निवड केली आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शहापुरी शाखा यांच्या वतीने सातारा येथे १३ व १४ मार्च रोजी हे संमेलन रंगणार आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शहापुरी शाखेचे विनोद कुलकर्णी यांनी ही माहिती कळवली आहे.

या दोन दिवसीय संमेलनात प्रकाशकांच्या समस्या, व्यवसायापलीकडचे लेखक-प्रकाशक स्नेहबंध, नामवंत लेखक आणि प्रकाशकांच्या मुलाखती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे संमेलन मार्च महिन्यात घेण्यात येत आहे.

नामवंत लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी कथा, कादंबऱ्या धार्मिक, संस्कृत, अनुवाद आदी साहित्य प्रकारांत शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘पॅपिलाॅन’, ‘बँको, ‘गाॅडफादर’, ‘जॅकडाॅज’, ‘सेकंड लेडी’, ‘मम आत्मा गमला’, ‘बिटवीन शेड्स ऑफ ग्रे’, ‘तिसरे महायुद्ध’, ‘अल्बर्ट आइन्स्टाइन’, ‘पेलिकन ब्रिफ’, ‘काैटिल्याचे अर्थशास्त्र’, ‘सत्तर दिवस’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅप्लिन’, ‘सुवर्णयोगी’ असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा लोकप्रिय लेखक पुरस्कार, कोल्हापूर येथील वुमेन्स फाउंडेशनतर्फे जीवनगाैरव पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि रेखा ढोले फाउंडेशन यांच्या वतीने अनुवाद क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

Web Title: Ravindra Gurjar as the President of the Writer-Publisher Literary Convention