पुणे: फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवलेले केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. केपीआयटी कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. ते ७५ वर्षांचे होते. सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. एस. बी. (रवी) पंडित हे के अँड पी ग्रुपचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक होते. हा ग्रुप तंत्रज्ञान, गतिशीलता आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी वचनबद्ध असलेला एक अग्रगण्य भारतीय उपक्रम आहे. गेल्या तीन दशकांमध्ये, त्यांनी जागतिक दर्जाचे नावीन्य आणि सखोल सामाजिक उद्देश यांचा संगम साधणाऱ्या संस्थांची उभारणी केली आणि त्यांचे नेतृत्व केले. रवी यांनी केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ही कंपनी सॉफ्टवेअर-डिफाइन्ड मोबिलिटीमधील एक जागतिक अग्रणी असून, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करत जगभरातील १५ देशांमध्ये कार्यरत आहे. त्यांनी कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंटंट्स (केपीसीए) या कंपनीचे अध्यक्षपद भूषवले, जी १५ देशांमध्ये कार्यरत असलेल्या १,२०० हून अधिक तज्ञांसह सर्वात मोठ्या भारतीय व्यावसायिक सेवा कंपन्यांपैकी एक आहे.
रवी पडित हे अमेरिकेतील एमआयटी च्या ‘स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट’चे माजी विद्यार्थी, सुवर्णपदक विजेते चार्टर्ड अकाउंटंट आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी, ॲमिटी युनिव्हर्सिटी, टीव्हीएम युनिव्हर्सिटी व ईएमबी युनिव्हर्सिटी या संस्थांच्या मानद डॉक्टरेट पदव्यांचे मानकरी होते. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी’चे (INSA) ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
Web Summary : Ravi Pandit, Chairman of KPIT Technologies and Forbes billionaire, passed away in Pune at 75. He co-founded K and P Group, focusing on technology and sustainability. Pandit was also associated with KPIT and Kirtane & Pandit Chartered Accountants. He held honorary doctorates and was an INSA Fellow.
Web Summary : केपीआईटी टेक्नोलॉजीज के अध्यक्ष और फोर्ब्स के अरबपति रवि पंडित का 75 वर्ष की आयु में पुणे में निधन हो गया। उन्होंने के एंड पी ग्रुप की सह-स्थापना की, जो प्रौद्योगिकी और स्थिरता पर केंद्रित है। पंडित केपीआईटी और कीर्तने एंड पंडित चार्टर्ड अकाउंटेंट्स से भी जुड़े थे। उन्होंने मानद डॉक्टरेट की उपाधि प्राप्त की और वे आईएनएसए फेलो थे।