शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरात रंगला शिवजन्मोत्सव

By admin | Updated: February 20, 2017 02:25 IST

शहरात छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा केला. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये युवकांनी सायंकाळी

बारामती : शहरात छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा केला. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये युवकांनी सायंकाळी शहरातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची रॅली काढली. या रॅलीमध्ये पारंपरिक पद्धतीने भगवे फेटे परिधान केलेल्या युवक-युवतींनी सहभाग घेतला.बारामती शिवजयंती महोत्सव समिती आणि बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक जयसिंग देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक भराटे, बाळासाहेब जाधव, समीर चव्हाण, नाना सातव, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक सुधीर पानसरे उपस्थित होते.याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच, महात्मा फुले, शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. जयंतीनिमित्त संपूर्ण बारामती शहर हे शिवमय झाले होते. सायंकाळी शहरातून श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याची सजविलेल्या वाहनामध्ये रॅली काढली. रॅलीमध्ये पारंपरिक पद्धतीने भगवे फेटे परिधान केलेल्या युवती, युवक दुचाकीवर सहभागी झाले होते. जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणा शहरात दुमदुमल्या. जयंतीनिमित्त्य व्याख्यान व वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे समितीने सांगितले. मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष विकास खोत, तालुकाध्यक्ष प्रा. गोविंद वाघ, सचिन घाटगे, मुकेश घाटगे, सतीश भगत, महेंद्र गायकवाड व विविध संघटना सहभागी होत्या. आभार वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे महासचिव प्रकाश टेमगर यांनी नियोजन केले.दरम्यान, बारामती तालुका मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सेवा संघाच्या वतीने जिजाऊ भवन येथे जयंतीनिमित्त शिवप्रतिमेचे नगराध्यक्षा तावरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन केले. या वेळी जिजाऊ सेवा संघाच्या वतीने महिलांनी पारंपरिक पध्दतीने पाळणागीत गायन करुन शिवजन्मोत्सव साजरा केला. रांगोळी काढून, भगवे ध्वज लावून या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, अशी माहिती सेवा संघाचे प्रदीप शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)