शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचा प्रश्न लज्जास्पद

By admin | Updated: March 20, 2015 00:59 IST

देशातील काही राज्यांमध्ये आजही बालकुपोषणाचा प्रश्न गंभीर असून, ही बाब लज्जास्पद आहे. तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत,

पुणे: देशातील काही राज्यांमध्ये आजही बालकुपोषणाचा प्रश्न गंभीर असून, ही बाब लज्जास्पद आहे. तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे मत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. के. जी. बालकृष्णन यांनी गुरुवारी व्यक्त केले.राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘लोकसत्ता : समाज आणि मानव अधिकाराचे बदलते पैलू’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती बालाकृष्णन बोलत होते. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, मानवाधिकार आयोगाचे महासचिव राजेश किशोर, सदस्य एस.सी. सिन्हा, सरोज कुमार शुक्ल, सादिक सय्यद, विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.बालकृष्णन म्हणाले, की देशात गहू व तांदळाचे विक्रमी उत्पादन होत आहे. परंतु, देशातील अन्नधान्य वितरण व्यवस्था सक्षम नसल्यामुळे रेशनिंगचे धान्य सडून जात आहे. त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये भेडसावत असलेला कुपोषणाचा प्रश्न लज्जास्पद आहे. गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे देशात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यातच खाणकामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्यामुळे त्यांचे वयोमान अवघे ४0 वर्षे झाले आहे. या सर्व गंभीर प्रश्नांकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाला चांगले जीवन जगता यावे यासाठी काही गोष्टीचे रूपांतर कायद्यात केले आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा मानवाधिकारांचा प्रचार आणि प्रसार करायला हवा.एस.सी. सिन्हा म्हणाले, की स्वतंत्र धर्मपालन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हे मानवाधिकाराचे काही पैलू आहेत. अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी मिळणे हे मानवाधिकारातच येते. त्यातच आता स्वच्छ व स्वस्त पर्यावरणात जीवन जगण्याच्या नवीन अधिकारावर चर्चा केली जात आहे.सादिक सय्यद म्हणाले, की महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित आले पाहिजे.डॉ. गाडे म्हणाले, ‘‘ घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. प्रत्येक मानवाने दुसऱ्याच्या भावनांचा विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर बहुतांश प्रश्न सुटू शकतील. मानवाधिकारांचा विचार खासगी क्षेत्रात केला जात नाही. परंतु, खासगी क्षेत्रातही मानवाधिकारांचे पालन केले गेले पाहिजे.’’