शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! मराठमोळ्या जितेंद्र गवारेचे 'एव्हरेस्ट'वर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 16:40 IST

पुण्यातील गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याची कामगिरी केली आहे...

ठळक मुद्देएका महिन्यात दोन अष्टहजारी शिखर केले पार

पिंपरी : पुण्यातील गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याची कामगिरी केली आहे. अवघ्या पंचवीस दिवसांपूर्वी जगातील दहावे उंच शिखर असलेले अन्नपूर्णा मोहीम पूर्ण केल्यानंतर लगेचच सर्वोच्च शिखर सर करण्याची कामगिरी गवारे यांनी केली आहे. 

पुण्यातील वडगाव शेरी येथे राहणाऱ्या गवारे (वय ४२) यांनी बुधवारी (दि १२) सकाळी साडेसातच्या सुमारास एव्हरेस्टवर पाऊल एक नवा इतिहास रचला. गिरिप्रेमीचे सदस्य असलेल्या गवारे यांनी १६ एप्रिल रोजी माउंट अन्नपूर्णा-१ शिखर (८०९१ मीटर) सर केले होते. अवघ्या पंचवीस दिवसांच्या अंतराने दोन आठ हजार मीटरहून अधिक उंचीचे शिखर सर करण्याची कामगिरी केली. या पूर्वी मुंबईच्या केवल कक्का याने एकाच महिन्यात दोन अष्टहजारी शिखरांवर चढाई केली होती.

गवारे यांनी लेह मधील जिग्मेट आणि शेर्पासह ही मोहीम पूर्ण केली. पुण्याहून एव्हरेस्टवीर गणेश मोरे, गिर्यारोहक विवेक शिवदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. अविनाश कांदेकर यांनी जितेंद्रला हवामानाचा अचूक अंदाज सांगितला. त्यामुळेच जितेंद्र आणि त्यांचा शेर्पा याना ८८४८.८६ मीटर उंचीच्या एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य झाले. 

ज्येष्ठ गिर्यारोहक आणि अष्टहजारी मोहिमेचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्टवीर भूषण हर्षे, तीन अष्ट हजारी मोहिमा पूर्ण करणारे डॉ. सुमित मांदळे यांनी गवारे यांना मार्गदर्शन केले.-----गवारे यांची या पूर्वीची कामगिरीगवारे यांनी यापूर्वी २०१९ साली जगातील तिसऱ्या उंचीच्या कांचनजुंगा पर्वतावर तिरंगा फडकवला होता. त्याच वर्षी हिमालयातील माउंट अमा डबलाम (६८१२ मीटर) ही खडतर मोहिमही त्यांनी पूर्ण केली आहे. हे शिखर एव्हरेस्ट पेक्षा कमी उंचीचे असले तरी गिर्यारोहकांना चढाईसाठी एव्हरेस्ट पेक्षा खडतर वाटते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEverestएव्हरेस्टTrekkingट्रेकिंगPuneपुणे