Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या..! पुण्यातून 'या' दिशेने बाहेर जाणारा मार्ग उद्या ३ तास बंद असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:48 IST2026-02-04T17:47:44+5:302026-02-04T17:48:54+5:30

Pune Traffic Update for Feb 5: -रस्ता रुंदीकरणासाठी होणार ब्लास्टिंग, असा असेल पर्यायी मार्ग

Pune residents, pay attention The road leading out of Pune in this direction will be closed for 3 hours tomorrow | Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या..! पुण्यातून 'या' दिशेने बाहेर जाणारा मार्ग उद्या ३ तास बंद असणार

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या..! पुण्यातून 'या' दिशेने बाहेर जाणारा मार्ग उद्या ३ तास बंद असणार

पुणे: हडपसर ते दिवेघाट दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या अंतर्गत दिवेघाट परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी उद्या, गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी 'ब्लास्टिंग' (खडक फोडण्याचे काम) करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक कधी बंद राहणार? पुणे शहर वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या तीन तासांच्या कालावधीत हडपसर ते दिवेघाट दरम्यानची वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णतः बंद राहील.

का घेतली जातेय ही खबरदारी? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) दिवेघाटात डोंगराचा भाग फोडण्यासाठी ब्लास्टिंग केले जाणार आहे. ब्लास्टिंग दरम्यान दगड आणि माती रस्त्यावर येण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी आवाहन
या तीन तासांच्या कालावधीत सासवड किंवा जेजुरीकडे जाणाऱ्या आणि तिथून पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी दिवेघाटाऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा. प्रवाशांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा, पुणे शहर) यांच्याकडून करण्यात आले आहे.

Web Title : पुणे-दिवेघाट मार्ग बंद: कल ब्लास्टिंग कार्य के लिए तीन घंटे रुकावट

Web Summary : कल, पुणे-दिवेघाट मार्ग सड़क चौड़ीकरण के लिए ब्लास्टिंग कार्य के कारण सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक तीन घंटे के लिए बंद रहेगा। यात्रियों को इस दौरान असुविधा से बचने के लिए सासवड या जेजुरी के वैकल्पिक मार्गों का उपयोग करने की सलाह दी जाती है।

Web Title : Pune-Diveghat Road Closure: Three-Hour Halt for Blasting Work Tomorrow

Web Summary : Tomorrow, the Pune-Diveghat road will be closed for three hours, from 11 AM to 2 PM, due to blasting work for road widening. Travelers are advised to use alternative routes to Saswad or Jejuri during this period to avoid inconvenience.