Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; सिंहगड रोडवर झाड कोसळल्याने एका फुल विक्रेत्या महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:10 IST2026-04-02T19:09:16+5:302026-04-02T19:10:18+5:30

Pune Rain नवश्या मारुती मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड महिलेच्या टपरीवर कोसळले, या घटनेत गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला

Pune Rain Unseasonal rains wreak havoc in Pune; A flower seller dies after a tree falls on Sinhagad Road | Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; सिंहगड रोडवर झाड कोसळल्याने एका फुल विक्रेत्या महिलेचा मृत्यू

Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; सिंहगड रोडवर झाड कोसळल्याने एका फुल विक्रेत्या महिलेचा मृत्यू

पुणे: शहरात झालेल्या अवकाळी पावसात मंदिराच्या शेजारी फुल विक्रीसाठी बसलेल्या एका महिलेच्या अंगावर मोठे झाड कोसळले. यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिराजवळ घडली. रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रंजना गिरी या दत्तवाडी येथील गणेश मळा परिसरात राहण्यास आहे. त्यांचा फुल विक्रीचा व्यावसाय होता. गुरूवारी (दि. २) हनुमान जयंती असल्याने त्या सकाळीपासूनच सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिराजवळ फुल विक्रीसाठी बसलेल्या होत्या. मंदिराशेजारी त्यांची फुल विक्रीची एक बनवलेली टपरी होती. दरम्यान, दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. यामध्ये अनेक भागात झाडपडीच्या घटना घडल्या. त्याचवेळी नवश्या मारुती मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड महिलेच्या टपरीवर कोसळले. यात महिला अडकली गेली. गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला.

Web Title : पुणे वर्षा: पेड़ गिरने से दुकान पर महिला की मौत

Web Summary : पुणे में भारी बारिश और तेज हवाओं के दौरान एक मंदिर के पास फूल बेचने वाली महिला की दुकान पर पेड़ गिरने से उसकी मौत हो गई। यह घटना सिंहगढ़ रोड पर हुई। पीड़िता, रंजना गिरी, 60 वर्ष की थीं।

Web Title : Pune Rain: Woman Dies After Tree Falls on Stall

Web Summary : A woman selling flowers near a Pune temple died after a tree fell on her stall during heavy rains and strong winds. The incident occurred on Sinhagad Road. The victim, Ranjana Giri, was 60 years old.