"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:26 PM2024-05-26T12:26:48+5:302024-05-26T12:38:50+5:30

Ajit Pawar : काल अजित पवार बारामती दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

pune porsche car accident Deputy Chief Minister Ajit Pawar gave instructions to the parents | "तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?

"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?

Ajit Pawar ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी पुण्यात मध्यरात्री पोर्शे कारने दोन जणांना उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला.  ही पोर्शे कार पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांची होती. ही कार त्यांचा मुलगा वेदांत अग्रवाल चालवत होता. या प्रकरणी पुण्यातील लोकांनी त्या मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. सोशल मीडियावरही जोरदार वातावरण तापलं होतं. पोलिसांनी त्या मुलासह त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार यांनी बिल्डरांसह मुलांना सल्ला दिला आहे. 

“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

"पुणे, नागपूर, जळगावमध्ये गेल्या काही दिवसात अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या. यामध्ये आता आपल्या पालकांनी आपली मुलं व्यवस्थित राहतात का? रात्री कुठं जातात? काय करतात? याकडे सगळ्याच पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. डिपार्टमेंट त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी काम करेल.पण, आपला मुलगा चुकणार नाही.आपल्याकडे मुलांचे लाड जास्त करतात. मग केलेल्या लाडाची किंमत मोठी मोजावी लागते, आता अशा घटना घडत आहेत, असा सल्ला अजित पवार यांनी पालकांना दिला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते, यावेळी पवार एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. "कोणत्याही परिस्थितीत कायदा, नियम सगळ्यांना सारखा आहे. तो श्रीमंत बापाचा मुलगा असुदे किंवा कुणाचाही मुलगा असुदे. यामध्ये कुणीही चुका केल्या असतील तर सोडलं जाणार नाही. कायदा आणि नियम श्रेष्ठ आहे. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. बारामतीमध्ये काही मुलं चुकीचं वागत असतील तर लक्षात आणून दिलं पाहिजे. आपण सर्वांनी काळजी घेऊया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

ड्रायव्हरला दोन दिवस डांबले

पुणेअपघातातील बाळाच्या आजोबाला पुणेपोलिसांनी अटक केली आहे. या आजोबाने लाडक्या नातवाच्या पोर्शे कारवर ड्रायव्हर असलेल्या साक्षीदाराला डांबून ठेवले होते. तसेच त्याला धमक्याही दिल्या होत्या. या प्रकरणात आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

बिल्डर विशाल अग्रवाल याने सर्वात आधी अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा केला होता. प्रतापी बाळाला सोडविण्यासाठी या अग्रवालांनी भरपूर प्रयत्न केले. सुरुवातीला पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दिमतीला आणले, एफआयआरमध्ये साधी कलमे लावायला लावली, बाळाने दारु पिली हे न समजण्यासाठी उशिराने टेस्ट करायला लावणे आदी गोष्टी पोलिसांना हाताशी धरून करण्यात आली होती. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट आली आहे.  

Web Title: pune porsche car accident Deputy Chief Minister Ajit Pawar gave instructions to the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.