कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:42 PM2024-06-17T12:42:16+5:302024-06-17T12:48:32+5:30

West Bengal Kanchenjunga Express Train Accident Updates: रेल्वे मंत्रालयासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

Loco pilot, guard killed in Kanchenjunga Express Train accident see what Ministry of Railways CM Mamata Banerjee | कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...

कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...

West Bengal Kanchenjunga Express Train Accident Updates: पश्चिम बंगालमधील जलपायगुडी स्टेशनजवळ आज सकाळी कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान अपघात झाला. सियालदहला जात असताना ही गाडी उभी होती, तेव्हा पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालगाडीने  धडक दिली. या रेल्वेअपघातात मालगाडी थेट एक्स्प्रेस रेल्वेच्या डब्ब्यांवर चढली, त्यामुळे बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी असून मदतकार्य सुरू आहे. या अपघातात लोको पायलट आणि गार्डचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.

गार्ड-लोको पायलटचा मृत्यू

या अपघातात कंचनजंगा एक्स्प्रेसचे गार्ड आशिष आणि मालगाडीचा लोको पायलट यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण अपघातानंतर या गजबजलेल्या मार्गावरील इतर गाड्यांचा मार्ग वळवण्यात आल्याचे वृत्त आहे. हा मार्ग सिलीगुडी ठाकूरगंज मार्गे वळवण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून माहिती...

रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्यात रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. मालगाडी ट्रेन सिग्नलच्या पलीकडे जाऊन कंचनजंगा ट्रेनच्या मागील भागाला धडकली. कंचनजंगा कोचमध्ये दोन पार्सल व्हॅन आणि गार्ड कोच आहेत. एनडीआरएफ, विभागीय पथक आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. सध्या दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची नुकसान भरपाई

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींना ५० हजारांची नुकसान भरपाई मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PMO कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीदेवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताबाबत जाणून धक्का बसला. तपशीलवार माहिती जाणून घेतली जात आहे. कंचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीशी टक्कर झाल्याची माहिती आहे. बचावकार्य, वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Web Title: Loco pilot, guard killed in Kanchenjunga Express Train accident see what Ministry of Railways CM Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.