West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:40 AM2024-06-17T11:40:55+5:302024-06-17T11:41:40+5:30

Kanchenjunga Express Train Accident West Bengal: एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली असून यात सुमारे २०० लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Major train accident in West Bengal Goods train collides with Kanchenjunga Express 3 coaches badly damaged several dead More than 200 injured | West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू

West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू

Kanchenjunga Express Train Accident West Bengal: पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी एक मोठा रेल्वेअपघात झाल्याची बाब समोर आली. एका उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात काही किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला. सियालदहला जात असताना ही गाडी निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कांचनजंगाच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रंगपाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला. ट्रेन नुकतीच न्यू जलपाईगुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदहला जात होती.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आहे. अपघात एवढा भीषण होता की, एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर चढली. या बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोगी गॅस कटरने कापून काढण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जारी

 

कटिहार हेल्पलाइन नंबर1-09002041952
2-9771441956

कटिहार स्टेशन हेल्प डेस्क नंबर
6287801805

न्यू जलपाईगुड़ी इमरजेंसी नंबर
916287801758

कंचनजंगा ट्रेन अपघाताबाबत माहितीसाठी सियालदह स्टेशन वरील हेल्पलाइन नंबर
033-23508794
033-23833326

लम्बडिंग स्टेशन हेल्पलाइन नंबर
03674263958
03674263831
03674263120
03674263126
03674263858

गुवाहाटी स्टेशन हेल्पलाइन नंबर
03612731621
03612731622
03612731623

Web Title: Major train accident in West Bengal Goods train collides with Kanchenjunga Express 3 coaches badly damaged several dead More than 200 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.