शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलीस दलातही कोरोनाचा वाढला धोका;१४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी घेताहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 21:17 IST

आतापर्यंत पुणे पोलीस दलात १ हजार ७०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १२ जणांचा मृत्यु झाला आहे.

पुणे : शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली असून पोलीस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. अशात सध्या शहर पोलीस दलात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला केवळ ३ ते ४ पोलिसांना लागण होत होती. आता हेच प्रमाण १५ च्या पुढे गेले आहे. सध्या १४४ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना लागण झाली असून ते उपचार घेत आहेत.

आतापर्यंत १ हजार ७०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १२ जणांचा मृत्यु झाला आहे. संसर्ग वाढू लागल्याने काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. तसेच त्यामुळे साप्ताहिक बैठकाही सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर पोलीस दलातील १ हजार ४७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली. पुणे शहरात कोरोना संसर्ग सर्वच पातळीवर वाढू लागला. तसा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या १४४ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर हॉस्पिटल तसेच घरी उपचार करण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आता पुन्हा हॉस्पिटलमधील काही बेड राखीव ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कोरोनासंबंधी कोणती काळजी घ्यायची याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लसीकरणानंतर आता पोलिसांच्या कुटुंबियांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. ..........पोलीस दलात ९५ टक्के लसीकरण पूर्णशहर पोलीस दलातील ९५ टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ८५ टक्के पोलिसांनी पहिला डोस घेतला आहे. तर १० टक्के पोलिसांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे ५ टक्के पोलिसांनी अद्याप लस घेतलेली नाही़. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcommissionerआयुक्त