दिवे घाटातील काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार; वाहतूक कोंडी कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:56 IST2026-05-15T11:55:42+5:302026-05-15T11:56:08+5:30

- नितीन गडकरी यांनी पालखीद्वारात दिली माहिती

pune news work on Dive Ghat to be completed by December end; traffic congestion will be reduced | दिवे घाटातील काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार; वाहतूक कोंडी कमी होणार

दिवे घाटातील काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार; वाहतूक कोंडी कमी होणार

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गातील दिवे घाट हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. घाटातील कामाला गती आली आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार असून, रस्ता रुंदीकरणानंतर दिवे घाटातील वाहतूक कोंडीला आळा बसेल. तसेच इंधन आणि वेळेत बचत होणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि.१४) सांगितले.

गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिवे घाटात ७ मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणानंतर तो २१ मीटरचा होणार आहे. म्हणजेच दोन पदरी रस्ता आता चार पदरी होणार आहे. या घाटात १७ हेक्टर जमीन वनविभागाची आहे. वनविभागाची परवानगी आणि जागा मिळविण्यात बराच वेळ गेला, त्यामुळे या टप्प्यातील काम लांबले होते. मात्र, आता घाटातील काम प्रगतिपथावर असून, ६० टक्के पूर्ण झाले असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.

हडपसर ते दिवेघाट हा १३ कि.मी. अंतर आहे. या मार्गावर एक मोठा उड्डाणपूल, ५ छोटे पूल आहेत. या मार्गावरील कामही प्रगतीपथावर आहे. या मार्गावर माउलींचा रथ, तसेच वारकऱ्यांना चालण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली आहे. पालखी मार्गावर अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल, बायपास रस्ते तयार करण्यात आले आहेत. तसेच या मार्गावर ४० हजार झाडे लावण्यात आली आहेत. ४५० झाडांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महामार्गाच्या शेजारी काही ठिकाणी अमृत सरोवर ६६ (तलाव) विकसित करण्यात आले आहेत. तसेच ऐतिहासिक बाजीराव पेशवे विहीर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी विहिरीचे जतन करण्यात आले असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

 जेजुरीत उड्डाणपुलाला मंजुरी

खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जेजुरीत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलांची लांबी २ कि.मी. असणार आहे. त्यासाठी २५० कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. या पुलामुळे जेजुरीतील वाहतूक कोंडी सुटणार आहे. तर फलटण शहर विकासासाठी ९ कोटींची घोषणा करीत असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

पालखी महामार्ग आणि झालेले काम

- मार्ग आणि कामाची प्रगती                        

दिवेघाट ते हडपसर ६५ टक्के

लोणंद ते दिवेघाट १०० टक्के

धर्मपुरी ते लोणंद ९८ टक्के

खुडूस ते धर्मपुरी ९९ टक्के

वाखरी ते खुडूस ९९.७५ टक्के

Web Title : दिसंबर तक पूरा होगा दिवे घाट का काम, कम होगा ट्रैफिक जाम

Web Summary : दिसंबर तक दिवे घाट सड़क चौड़ीकरण का काम पूरा हो जाएगा, जिससे ट्रैफिक कम होगा। 21 मीटर चौड़ी सड़क से जाम कम होगा, समय और ईंधन की बचत होगी। काम 60% पूरा हो गया है, सुरक्षा के लिए फ्लाईओवर और बाईपास की योजना है। जेजुरी में फ्लाईओवर बनेगा; फलटण को विकास के लिए फंड मिलेगा।

Web Title : Dive Ghat Work to Finish by December, Traffic Congestion to Reduce

Web Summary : Dive Ghat road widening to finish by December, reducing traffic. The 21-meter-wide road will ease congestion, saving time and fuel. Work is 60% complete, with flyovers and bypasses planned for safety. Jejuri will get a flyover; Falton will get funds for development.