शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट कुठंय ? सचिन तेंडुलकरांचा पुण्यात तरुणाला थेट सवाल; १० सेकंदांचा प्रसंग झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:54 IST

- कोणताही स्टारडमचा आव न आणता, अगदी घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी प्रेमाने सांगितले, “हेल्मेट नाही? गाडी सावकाश चालव…”

पुणे -  पुणे शहरातील गजबजलेल्या टिळक रस्त्यावर एका तरुणासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा भावनिक क्षण घडला. क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आणि करोडो भारतीयांच्या हृदयातील ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर यांची अचानक भेट झाल्याने सोहम मरगजे हा तरुण भारावून गेला. मात्र या भेटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे सचिन यांनी दिलेला सुरक्षिततेचा मोलाचा संदेश दिला.

एस.पी. कॉलेज चौकात सिग्नल लागल्यामुळे वाहतूक थांबली होती.  बाजूला उभ्या असलेल्या रेंज रोव्हर गाडीची काच खाली झाली आणि आतून एक शांत, आपुलकीचा आवाज आला, हेल्मेट कुठे ? क्षणभर सोहमला विश्वासच बसला नाही. कारण समोर स्वतः सचिन तेंडुलकर उभे होते. कोणताही स्टारडमचा आव न आणता, अगदी घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी प्रेमाने सांगितले, “हेल्मेट नाही? गाडी सावकाश चालव…”

सचिन  तेंडुलकर यांचे हे शब्द काही सेकंदांत संपले, पण सोहमच्या मनात कायमचे कोरले गेले. त्या क्षणी त्याने सचिन यांच्यासोबत सेल्फी घेतला, मात्र त्याहून मोठी आठवण ठरली ती त्यांच्या काळजीची. या अनुभवाबद्दल बोलताना सोहम म्हणाला, क्रिकेटचा देव भेटला, ही आनंदाची गोष्ट होतीच. पण जाताना त्यांनी आयुष्य जपण्याची आठवण करून दिली. त्या एका वाक्यात माया, काळजी आणि प्रेरणा होती.  या घटनेनंतर सोहमने हेल्मेट नियमित वापरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हा प्रसंग वेगाने व्हायरल होत असून पुणेकरांकडून सचिन यांच्या साधेपणाचं आणि माणुसकीचं मोठं कौतुक केलं जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sachin Tendulkar Asks Pune Youth About Helmet; Moment Goes Viral

Web Summary : Sachin Tendulkar, in Pune, stopped a young man riding without a helmet to advise him on road safety. The chance encounter and Tendulkar's simple message of care resonated, going viral and highlighting his humility.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSachin Tendulkarसचिन तेंडुलकरPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र