शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नारायणपूर देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; तळेगाव ढमढेरेतील दोन युवकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:35 IST

या अपघातात समीर व सार्थक हे दोघे गंभीर जखमी झाले, तर दिपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.

तळेगाव ढमढेरे :  नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या दुचाकीला भरधाव टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात समीर संभाजी ढमढेरे (वय २१) व सार्थक विजय ढमढेरे (वय २०, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे, भीमा शेत, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव ढमढेरे (भीमा शेत) येथील दिपक ढमढेरे, समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे तिघे युवक ११ डिसेंबर रोजी दुचाकीवरून नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून घरी परतत असताना शिंदवणे घाटात समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात समीर व सार्थक हे दोघे गंभीर जखमी झाले, तर दिपक ढमढेरे किरकोळ जखमी झाला.

अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळी टेम्पो सोडून पळून गेला. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आज दि. १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास समीर संभाजी ढमढेरे व सार्थक विजय ढमढेरे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जखमी दिपक दत्तात्रय ढमढेरे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम.एच. १२ एल.टी. ०७४६ क्रमांकाच्या टेम्पोवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Youths Die in Tragic Accident After Narayanpur Temple Visit

Web Summary : Two youths from Talegaon Dhamdhere died in a road accident near Narayanpur after their bike was hit by a speeding tempo. Samir Dhamdhere and Sarthak Dhamdhere succumbed to their injuries. Police are investigating.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात