शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा दर प्रतिकिलो ४१ रुपये करा; इथेनॉल दरवाढीची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:39 IST

दरघटीमुळे साखर उद्योग अडचणीत; ऊस बिले अदा करण्यात अडथळे -हर्षवर्धन पाटील 

इंदापूर : चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेच्या दरात तब्बल तीनशे रुपयांची घट झाल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलचा विक्री दर वाढवावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरात साखरेचे दर ३ हजार ८५० रुपयांवरून ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतके घसरले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसताना साखरेच्या दरातील ही घसरण साखर कारखानदारीसाठी गंभीर ठरत आहे. सध्या देशभरात ऊस गळीत हंगाम वेगात सुरू असला, तरी साखर व इथेनॉल या दोन प्रमुख उत्पन्न स्रोतांमधून मिळणाऱ्या अपुऱ्या महसुलामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले अदा करणे कठीण होत आहे.

यामुळे कारखान्यांना बँकांकडून वाढीव कर्ज घ्यावे लागत असून, व्याजाच्या ओझ्याखाली दबले जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची उसाची बिले वेळेवर जमा व्हावीत, यासाठी साखरेचा किमान दर प्रतिकिलो ४१ रुपये आणि इथेनॉलचा विक्री दर वाढवणे अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

या मागण्यांबाबत वेळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व उत्तर प्रदेश या प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील साखर कारखानदारीचे प्रतिनिधी असलेले राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे शिष्टमंडळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन वस्तुस्थितीनिष्ठ व अधिकृत आकडेवारी सादर करून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तफावतीमुळे आर्थिक ताण

साखर (नियंत्रण) आदेश २०२५ च्या कलम ९ नुसार साखरेच्या किमान आधारभूत किमतीत उसाचा एफआरपी, रूपांतरण खर्च व उपउत्पादनांच्या महसुलाचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या प्रतिटन उसाचा तोडणी व वाहतुकीसह सरासरी खर्च चार हजार रुपयांपेक्षा अधिक आहे, तर साखरेची सरासरी विक्री किंमत ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. या तफावतीमुळे आर्थिक ताण वाढून उसाची देयके देण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

याआधी साखरेची प्रतिकिलो किमान विक्री किंमत ३१ रुपये असताना उसाचा प्रतिटन एफआरपी २ हजार ७५० रुपयांवरून ३ हजार ५५० रुपयांपर्यंत वाढला असून, ही वाढ सुमारे २६ टक्के आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशात एक्स-मिल साखरेचे दर ३८ ते ४० रुपये प्रति किलो, तर किरकोळ विक्री दर ४६ ते ४७ रुपये प्रति किलो होते. हे दर ग्राहकांनी विनातक्रार स्वीकारल्याने साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.  -हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ

English
हिंदी सारांश
Web Title : Raise sugar price to ₹41/kg; demand for ethanol price hike.

Web Summary : Sugar industry seeks ₹41/kg minimum price and higher ethanol rates due to falling sugar prices. Farmers face delayed payments. Cooperative federation urges government intervention to alleviate financial strain and ensure timely payments to sugarcane farmers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रSugar factoryसाखर कारखाने