पुणे : महारेराने गेल्या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल १० हजार ३७९ गृहनिर्माण प्रकल्पांना विविध परवानग्या दिल्या आहेत. यातील ४ हजार २०४ गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. तर २ हजार ४८८ गृहनिर्माण प्रकल्पांतील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. तसेच, जुन्या प्रकल्पांबाबत विकासकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार ३ हजार ६८७ गृहनिर्माण प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून मंजुरी घेताना सादर केलेल्या प्रस्तावात काही दुरुस्त्या, बदल किंवा वाढ करण्यात आली असल्यास या सर्व सुधारणा महारेराकडून वेळोवेळी नियमित करून घेणे बंधनकारक आहे. तसेच महारेराकडे नोंदणी करताना विकासकांना प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रकल्प पूर्ततेची निश्चित तारीख द्यावी लागते. प्रकल्पाला काही कारणाने उशीर झाल्यास अशावेळी संबंधित विकासकांना महारेराकडून मुदतवाढ घ्यावी लागते. मुदतवाढ न घेतल्यास प्रकल्प व्यापगत प्रकल्पांच्या यादीत जाऊन त्याचे काम प्रभावित होते. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महारेराकडून मुदतवाढ घेणे म्हणून अत्यावश्यक आहे.
त्यामुळे ग्राहकहिताच्या दृष्टीने मुदतवाढ आणि सुधारणांना मंजुरी देणे अत्यावश्यक आहे. ही कारवाई स्थावर संपदा क्षेत्रातील प्रस्तावांचे जलद निराकारण, पारदर्शकता आणि घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करीत कार्यक्षम प्रकल्प नियमन करण्यासाठी महारेराची वचनबद्धताच दर्शवते. प्रकल्पांच्या संख्येत पुणे जिल्हा ३ हजार १५० प्रकल्पांसह नेहमीप्रमाणे आघाडीवर असून, विभागातील संख्येच्या बाबतीत मुंबई महाप्रदेश ५ हजार ४९४ प्रकल्पांसह स्थावर संपदा क्षेत्रातील राज्यातील आपला दबदबा कायम ठेऊन आहे. मुंबई महाप्रदेशात ठाणे १ हजार ७१४ आणि १ हजार ९६९ प्रकल्पांसह मुंबई उपनगर आघाडीवर आहे.
पुणे परिसरातील ३ हजार ५६६ प्रकल्पांत पुण्यानंतर प्रत्येकी १४५ प्रकल्पांसह कोल्हापूर, सातारा विकसित होत आहेत. विदर्भात एकूण ५६३ प्रकल्प असले, तरी यात नागपूरच्या ४७४ प्रकल्पांचा वाटा आहे. उत्तर महाराष्ट्रातही एकूण ५२० प्रकल्पांत नाशिकचे ४५४ प्रकल्प आहेत, तर मराठवाड्यातील २०३ प्रकल्पांत संभाजीनगरचे १५५ प्रकल्प आहेत.
महारेरा निर्धारित केलेल्या कायदेविषयक, तांत्रिक आणि आर्थिक निकषांची काटेकोर छाननी करून त्याची पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महारेराच्या नोंदणी विभागाची समग्र यंत्रणा यथोचित प्रयत्नशील आहे.
-------
जिल्हानिहाय मंजुरी :
मुंबई महाप्रदेश एकूण ५,४९४, ठाणे १,७१४, मुंबई उपनगर १,६९६, रायगड ९३९, पालघर ५६८, मुंबई शहर ३७५, रत्नागिरी १३४ आणि सिंधुदुर्ग ६८
------
पुणे परिसर एकूण ३,५६६ - पुणे ३,१५०, सातारा १४५, कोल्हापूर १४५, सांगली ६६, सोलापूर ६०.
-----
विदर्भ- एकूण ५६३
नागपूर ४७४, अमरावती २८, अकोला १८, वर्धा १८, चंद्रपूर १३, यवतमाळ ५, बुलढाणा ४, भंडारा २, वाशिम १
-------
खान्देश- एकूण ५२०
नाशिक ४५४, अहिल्यानगर ४३, धुळे १४, जळगाव ८ आणि नंदुरबार १
------
मराठवाडा- एकूण २०३
संभाजीनगर १५५, लातूर १८, नांदेड ११, जालना ७, धाराशिव आणि परभणी प्रत्येकी ४ आणि हिंगोली १.
------
दादरा नगर हवेली - २९
दमण - ४
Web Summary : MahaRERA approved 4,204 housing projects and extensions for 3,687 old projects, boosting Maharashtra's real estate. Pune leads with 3,150 projects, while the Mumbai Metropolitan Region dominates with 5,494. This ensures transparency and protects homebuyer interests.
Web Summary : MahaRERA ने 4,204 गृहनिर्माण परियोजनाओं और 3,687 पुरानी परियोजनाओं के विस्तार को मंजूरी दी, जिससे महाराष्ट्र के रियल एस्टेट को बढ़ावा मिला। पुणे 3,150 परियोजनाओं के साथ आगे है, जबकि मुंबई महानगर क्षेत्र 5,494 के साथ शीर्ष पर है। इससे पारदर्शिता सुनिश्चित होती है और घर खरीदारों के हितों की रक्षा होती है।