शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिका प्रशासनाकडून आरएमसी प्रकल्पावर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:20 IST

‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर पालिकेची धडक कारवाई ; लोहगावातील सात आरएमसी प्लांट केले जमीनदोस्त

पुणे : शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकल्पाकडे पालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याबद्दल ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला आहे. अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली असून, बुधवारी लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील सात अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने पहाटेच ही धडक कारवाई केली. दरम्यान, इतर भागांतील आरएमसी प्लांटवरही अशीच कारवाई होणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शहरातील नागरीवस्तीतील आरएमसी प्रकल्पाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाला नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. लोहगाव व परिसरात मागील काही काळात औद्योगिक स्वरूपाचे अनधिकृत प्लांट आणि शेड्स मोठ्या प्रमाणावर उभारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करत हा प्रश्न समोर आणला. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली बुधवारी पहाटे २ वाजता लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसर, येथील ७ अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ७५ जवान, १६ जेसीबी, ५ गॅसकटर, २ ब्रेकर, ३० सहायक अतिक्रमण निरीक्षक आणि ८५ बिगारी सेवकांचा समावेश होता. महापालिकेने नियोजनबद्ध कारवाई करत ७ अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त केले.

 खराडीतील ५२ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर हातोडा

खराडी ईऑन आयटी पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत एकूण ५२ हजार २५० चौरस फूट अनधिकृत कच्चे, पक्के शेड, बांधकामावर हातोडा चालविण्यात आला. पहाटेच्या वेळी कारवाई केल्यामुळे नागरिकांचा विरोध टाळण्यात प्रशासनाला यश आले. 

कारवाईला विरोध करत नगरसेविकेच्या पतीची अरेरावी

महापालिकेचे पथक लोहगाव येथील आरएमसी प्लांटवर कारवाईसाठी दाखल झाले. ही माहिती मिळताच भाजप नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम खांदवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरएमसी प्लांटवरील कारवाई थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. प्रीतम खांदवे अंगावर धावून गेल्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या रक्षकांनी त्यांना ताब्यात घेत पिंजऱ्यात बसवले आणि पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर आरएमसी प्लांटवरील कारवाई पूर्ण करण्यात आली. 

गेल्या दोन महिन्यांपासून हा प्लांट सील होता. कोणतीही नोटीस न देता मध्यरात्री दोन वाजता कारवाई सुरू केली. मी फक्त कागदपत्रांची विचारणा केली. तेव्हा महापालिकेचे कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले. मी अंगावर गेलो नव्हतो. अचानक ते समोर आल्यामुळे मी दचकलो, यात त्यांच्या अंगाला धक्का लागला असेल; पण कोणताही वाद झालेला नाही. त्यानंतर त्यांनी पिंजऱ्यात बसवले आणि दोन तास फिरवले. - प्रीतम खांदवे, नगरसेविकेचे पती   

लोहगाव येथे कारवाई करताना प्रीतम खांदवे पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना पिंजऱ्यात बसवून पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर महापालिकेने उर्वरित कारवाई पूर्ण केली. - सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation Demolishes Illegal RMC Plants Amidst Dust Pollution Concerns

Web Summary : Pune authorities demolished seven unauthorized RMC plants in Lohgaon due to dust pollution concerns raised by Lokmat. An additional 52,000 sq ft of illegal construction in Kharadi was also razed. A corporator's husband was detained for obstructing the demolition.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे