Pune Nasrapur Case: नसरापूर प्रकरणात चिमुकलीच्या मृत्यूचे कारण आले समोर; संदीपसिंह गिल यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:14 IST2026-05-08T15:14:23+5:302026-05-08T15:14:40+5:30

Pune Nasrapur Case या प्रकरणाची बाजू सक्षम होण्यासाठी वेगवेगळे पुरावे गोळा केले आहेत, त्यात तांत्रिक पुराव्यांचाही समावेश आहे

Pune Nasrapur Case The cause of the child's death in the Nasrapur case came to light Sandeep Singh Gill gave important information | Pune Nasrapur Case: नसरापूर प्रकरणात चिमुकलीच्या मृत्यूचे कारण आले समोर; संदीपसिंह गिल यांनी दिली महत्वाची माहिती

Pune Nasrapur Case: नसरापूर प्रकरणात चिमुकलीच्या मृत्यूचे कारण आले समोर; संदीपसिंह गिल यांनी दिली महत्वाची माहिती

पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व तिचा निर्घृण खून केल्या प्रकरणात तांत्रिक व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. तपासात तिचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आरोपीच्या मागील कोणत्याही केसेस ओपन केल्या जाणार नाहीत. मात्र, याच गुन्ह्यात त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिले आहे.

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर केलेल्या विकृत कृत्याचे पडसाद राज्यभर उमटले असून, आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ही घटना घडल्यापासून फडणवीस या प्रकरणाचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

ग्रामीण पोलिसांनी आरोपीला नसरापूर येथे घेऊन जात घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली आहे, तसेच आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, साक्षीदारांचा तपास केला आहे. आरोपीवर १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे गिल यांनी सांगितले. या प्रकरणाची बाजू सक्षम होण्यासाठी वेगवेगळे पुरावे गोळा केले आहेत, त्यात तांत्रिक पुराव्यांचाही समावेश आहे. मात्र, अद्याप काही गोष्टी जप्त करणे बाकी आहे. हे कृत्य नियोजन बद्ध आहे का याचाही तपास पोलिस करीत आहेत. यासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली असता न्यायालयाने ती मान्य केली असल्याचेही ते म्हणाले.

Web Title : नसरापुर मामला: दम घुटने से हुई बच्ची की मौत: संदीप सिंह गिल

Web Summary : नसरापुर में बच्ची की मौत दम घुटने से हुई। पुलिस के पास सीसीटीवी फुटेज और गवाह हैं। आरोपी को कठोर सजा मिलेगी; 15 दिनों में आरोप पत्र दाखिल। आगे की जाँच जारी।

Web Title : Nasrapur Case: Girl's death caused by suffocation, says Sandeep Singh Gill.

Web Summary : Nasrapur girl's death was due to suffocation. Police have CCTV footage and witnesses. Accused will face strict punishment; charge sheet filed within 15 days. Further investigation ongoing.