Pune Nashik Highway Traffic : पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा विकेंड ट्रॅफिकचा कहर; आळेखिंडीत ३ किमी वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:39 IST2026-05-09T12:37:30+5:302026-05-09T12:39:54+5:30

- महामार्गावरील पुणे मार्गिकेवर सध्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ही लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Pune Nashik Highway Traffic: Weekend traffic chaos again on Pune-Nashik highway; 3 km long queue of vehicles in Alekhinedi | Pune Nashik Highway Traffic : पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा विकेंड ट्रॅफिकचा कहर; आळेखिंडीत ३ किमी वाहनांच्या रांगा

Pune Nashik Highway Traffic : पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा विकेंड ट्रॅफिकचा कहर; आळेखिंडीत ३ किमी वाहनांच्या रांगा

आळेफाटा (पुणे जि.) - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे शनिवार-रविवारचा प्रवास पुन्हा एकदा वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. आळेखिंडी परिसरात शनिवारी सकाळपासूनच वाहनांच्या तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली. प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे आणि पोलिस बंदोबस्ताच्या अभावामुळे प्रवाशांना तासनतास कोंडीत अडकून राहावे लागले.

महामार्गावरील पुणे मार्गिकेवर सध्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ही लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि नाशिक या दोन्ही दिशेची वाहतूक केवळ एका लेनवरून वळवण्यात आली आहे. विकेंडमुळे पुण्याकडून नाशिक, संगमनेर आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सकाळपासूनच वाहतुकीचा ताण वाढला. वाहनांची गर्दी वाढत असताना आळेखिंडीत वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी पोलिस यंत्रणा नसल्याचे चित्र दिसून आले. अनेक वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने घालण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. परिणामी, काही ठिकाणी किरकोळ वाद आणि गोंधळाच्या घटनाही घडल्या. 

कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे हाल विशेषतः उष्णतेमुळे अधिक वाढले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रुग्णवाहिकांनाही वाहतुकीतून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून महामार्ग पोलिसांनी तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करावेत तसेच संबंधित कंत्राटदाराला कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रविवारी नाशिककडून पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने दुपारनंतर पुन्हा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title : पुणे-नासिक राजमार्ग पर यातायात जाम: सप्ताहांत में आलेफटा में 3 किमी तक कतारें

Web Summary : पुणे-नासिक राजमार्ग पर निर्माण के कारण सप्ताहांत में यातायात जाम। आलेफटा में 3 किमी तक कतारें। अपर्याप्त पुलिस उपस्थिति से भीड़भाड़ और बढ़ गई, जिससे यात्रियों को परेशानी हुई, खासकर गर्मी और पानी की कमी के कारण।

Web Title : Pune-Nashik Highway Gridlock: Weekend Traffic Snarls, 3km Queues at Alephata

Web Summary : Weekend traffic chaos on Pune-Nashik Highway due to construction delays. Alephata sees 3km queues. Insufficient police presence worsens congestion, causing hardship for travelers, especially with heat and lack of water.