शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात ५६ ठिकाणी पावसाच्या पुराचा धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:51 IST

महापालिका आयुक्तांनी सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला.

पुणे : शहरातील पावसाचे पाणी साचणाऱ्या ५६ ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करणे खर्चीक आणि वेळ खाणारे असल्याने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे या ५६ ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आयुक्तांनी सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. शहरात पावसाळ्यात पाणी साचणारी सुमारे १२० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची स्थिती तपासण्यात आली. यावेळी प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार, १२० पैकी ५६ ठिकाणी नवीन पावसाळी वाहिन्या टाकणे, चेंबर बांधणे, जुन्या वाहिन्या बदलणे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी जाळे विकसित करणे, अशी मोठ्या स्वरूपाची कामे करणे आवश्यक आहे. या कामांसाठी मोठ्या निधीसह किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ती यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे या ५६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पूरस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देता यावा, यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आणि अन्य उपाययोजना उपलब्ध ठेवण्यासह उर्वरित ६४ ठिकाणांवरील कामे पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: 56 Locations Face Flood Risk Due to Incomplete Work

Web Summary : Pune faces flood risk in 56 locations. Permanent solutions are costly and time-consuming. Temporary measures ordered by the Municipal Commissioner. Full completion is unlikely before monsoon season. Quick response teams and machinery are ready for emergencies.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMunicipal Corporationनगर पालिकाRainपाऊस