शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Pune Mini Lockdown : पुण्यात भाजप आक्रमक; खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 1:53 PM

Bjp Agitation In Pune : प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी आणि पीएमपी सेवा बंद च्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध....

पुणे: उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीनंतर पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश काढले आहे. त्यात पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीची कणा असलेली 'पीएमपीएल' सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याच्याच निषेधार्ह भाजपकडून जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी पोलिसांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पुण्यात संचारबंदी व पीएमपीएमएल सेवा बंद या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठीच खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या  ॲाफिस बाहेर आंदोलन केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.तसेच संचारबंदीचा आदेश आपण पाळणार नसल्याचे मुळीक यांनी यावेळी जाहीर केले आहे. मात्र, इतर कार्यकर्त्यांनी देखील इथे हजेरी लावली आहे. 

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी बापट आणि मुळीक यांची भेट घेत त्यांना जमावबंदीमुळे आंदोलन संपवण्याची विनंती केली.मात्र यावेळी भाजप नेत्यांनी त्यांची विनंती धुडकावून लावत माघार घेण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. खासदार गिरीश बापट म्हणाले “ लोकांना जायला न मिळण्याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हांला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, ग्रुप करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत करणे योग्य नाही. सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. कोरोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्यासाठी आमचा विरोध आहे. तसेच निर्णयाचा फेरविचार केला नाही तर भाजप कार्यकर्ते पीएमपीएल च्या प्रत्येक स्टॉपवर आंदोलन करतील असेही ते यावेळी म्हणाले. 

मुळीक म्हणाले “ सरकारने हा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. पीएमपीएमएल वर अनेक सर्वसामान्य लोक अवलंबून आहेत. या बसेस बंद करण्याचा निर्णय योग्य नव्हता. तरी देखील हा निर्णय घेतला आहे. कारण नसताना संचारबंदी लावली आहे. या अर्धवट लॅाकडाउन चा परिणाम खुप मोठा होणार आहे. सरकारने ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांना पॅकेज दिलं पाहीजे. त्यामुळे आम्ही संचारबंदीचा आदेश मोडणार आहोत.”

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाagitationआंदोलनAjit Pawarअजित पवारcommissionerआयुक्तPoliceपोलिसPMPMLपीएमपीएमएल