शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 9:11 AM

lok sabha election 2024 : मंडी लोकसभा मतदारसंघातील झाकरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौतने विरोधी उमेदवार आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांच्यावर निशाणा साधला. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. शनिवारी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपाच्या लोकसभा उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने विरोधकांवर निशाणा साधला. अनुचित टिप्पणी करणाऱ्या आणि राज्यातील महिलांचा अपमान करणाऱ्या  'शेहजादां'च्या टोळीला जनता धडा शिकवेल, असे कंगना राणौत म्हणाली. मंडी लोकसभा मतदारसंघातील झाकरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना राणौतने विरोधी उमेदवार आणि काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांच्यावर निशाणा साधला. 

"आता ते (विक्रमादित्य सिंह) म्हणत आहेत की, मी अपवित्र आहे, कारण मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर इथे आले आहे. मी आधी जाऊन स्वतःला शुद्ध करायला हवे. त्यांनी केलेले विधान अपमानास्पद वाटले, कारण चित्रपटांमध्ये काम करून मी माझ्या कुटुंबाला आधार दिला, माझ्या भावा-बहिणींना शिक्षण दिले, ॲसिड हल्ला पीडित बहिणीवर उपचार केले आणि राज्याचा अभिमान वाढवला", असे कंगना राणौत म्हणाली.

याचबरोबर, अयोग्य कमेंट करणाऱ्या आणि राज्यातील महिलांचा अपमान करणाऱ्या 'शेहजादां'च्या टोळीला तेथील लोक धडा शिकवतील, असे कंगना म्हणाली. तसेच, विक्रमादित्य सिंह पैशाच्या जोरावर निवडणुकीत उतरले आहेत. तर पीएम मोदींचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि वाढताना त्यांनी आईला संघर्ष करताना पाहिले. त्यामुळेच त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण दिल्याचा दावा कंगना राणौतने केला आहे.

दरम्यान, विक्रमादित्य सिंह यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला होता. कंगना राणौत उल्लेख करत विक्रमादित्य सिंह म्हणाले होते की, "मी प्रभू रामाकडे प्रार्थना करतो की तिला बुद्धी द्यावी आणि ती 'देवभूमी' हिमाचलमधून स्वतःला शुद्ध करेल आणि बॉलिवूडमध्ये परत जाईल, अशी आशा आहे. कारण ती निवडणूक जिंकणार नाही आणि याचे कारण तिला हिमाचलच्या लोकांबद्दल काहीच माहिती नाही."

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४himachal pradesh lok sabha election 2024हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४