Pune Metro: कोथरूडमधील प्रस्तावित मेट्रो स्थानक, बस आगार अन् उड्डाणपुलांच्या जागेवरून नागरिक आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:32 IST2026-05-09T16:31:21+5:302026-05-09T16:32:28+5:30

Pune Metro : मेट्रो स्थानक, बस आगार आणि उड्डाणपूल यांचे एकत्रित व शास्त्रीय वाहतूक नियोजन करावे, पौड रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी उपाय जाहीर करावेत.

Pune Metro Citizens are aggressive over the proposed metro station, bus depot and flyover site in Kothrud. | Pune Metro: कोथरूडमधील प्रस्तावित मेट्रो स्थानक, बस आगार अन् उड्डाणपुलांच्या जागेवरून नागरिक आक्रमक 

Pune Metro: कोथरूडमधील प्रस्तावित मेट्रो स्थानक, बस आगार अन् उड्डाणपुलांच्या जागेवरून नागरिक आक्रमक 

कोथरूड : कोथरूड परिसरात प्रस्तावित मेट्रो ठाणे, बस आगार आणि अर्धवट उड्डाणपूल यांच्या नियोजनाबाबत नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. योग्य नियोजन करा, अन्यथा तीव्र आंदोलन या मागणीसाठी परिसरात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

या समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी समाज माध्यमावर ग्रुप तयार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पौड रोड परिसरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत असून, प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मोहिमेद्वारे मेट्रो स्थानक, बस आगार आणि उड्डाणपूल यांचे एकत्रित व शास्त्रीय वाहतूक नियोजन करावे, पौड रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी उपाय जाहीर करावेत. तसेच नागरिक, व्यापारी आणि वाहतूक तज्ज्ञांसमोर सादरीकरण करावे, अशा मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत. तसेच, स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि हरकती लेखी स्वरूपात स्वीकारण्यात याव्यात व विकासकामांमुळे होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सह्यांची मोहीम पुढील काही दिवस कोथरूड परिसरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी राहुल चव्हाण, नीलेश सैंदाणे, विशाल अट्टल, अमित बोत्रे, प्रशांत कानोजिया, अनिल चौधरी, विनोद मावाणी, ज्योती किरण पाटील, मोनीश ठाकूर आणि पार्थ सोनवणे उपस्थित होते.

जर उड्डाणपूल करायचाच असेल, तर तो कचरा डेपोपासून थेट चांदणी चौकापर्यंत दुमजली पूल सलग झाला पाहिजे. मेट्रो स्टेशन लोहिया जैनला न करता चांदणी चौकात करता येईल. पश्चिमेचे दार असलेल्या परिसराला पुणे बंगळूरु महामार्गाला जोडणे होईल. - प्रशांत कानोजिया, स्थानिक नागरिक, कोथरूड
 

या परिसरात मेट्रो काम सुरू आहे. काही सुचवायचे असेल, तर ते ग्राहक केंद्राला द्या. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या. - हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, मेट्रो पुणे.

 

या अगोदर खूप सारी व्यापारी लोक व स्थानिक नागरिक यांनी वारंवार मेट्रो कार्यालयासोबत पत्र व्यवहार झाला आहे. खूप वेळा मागण्या करून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचे नागरिकांना प्रेझेंटेशन दिले नाही व कुठल्याही पत्राला लेखी उत्तर दिले नाही.  - राहुल चव्हाण, स्थानिक नागरिक, कोथरूड.

 

Web Title : पुणे मेट्रो: कोथरुड में प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डिपो, फ्लाईओवर का विरोध।

Web Summary : कोथरुड के निवासी और व्यवसायी यातायात संबंधी चिंताओं के कारण प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डिपो और अधूरे फ्लाईओवर का कड़ा विरोध कर रहे हैं। वे उचित योजना की मांग करते हैं और विरोध प्रदर्शन की धमकी देते हैं, व्यापक यातायात समाधान और सार्वजनिक परामर्श की आवश्यकता पर जोर देते हैं।

Web Title : Kothrud citizens protest Pune Metro station, bus depot, flyover locations.

Web Summary : Kothrud residents and businesses strongly oppose the planned metro station, bus depot, and incomplete flyover due to traffic concerns. They demand proper planning and threaten protests, emphasizing the need for a comprehensive traffic solution and public consultation.