ऊसाच्या शेतात अचानक हालचाल,पाहिले तर बिबट्याचे दोन बछडे..! शिरूर तालुक्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:41 IST2026-02-04T17:39:55+5:302026-02-04T17:41:48+5:30

वनविभागाच्या वतीने सदर शेतातील बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune Leopard Sudden movement in the sugarcane field, two leopard cubs seen..! Excitement in Shirur taluka | ऊसाच्या शेतात अचानक हालचाल,पाहिले तर बिबट्याचे दोन बछडे..! शिरूर तालुक्यात खळबळ

ऊसाच्या शेतात अचानक हालचाल,पाहिले तर बिबट्याचे दोन बछडे..! शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर : तालुक्यातोल आंबळे येथील शेतात ऊस तोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या वतीने सदर शेतातील बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंबळे येथील शेतकरी प्रकाश बेंद्रे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात दोन बिबट्याचे बछडे दिसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.   याबाबतची समजताच बेंद्रे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे व वनपरिमंडल अधिकारी भानुदास शिंदे यांना ही माहिती दिली.

माहिती मिळताच नियतक्षेत्र वनअधिकारी गणेश झिरपे, वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर शरद गदादे, सुधीर शितोळे, शेरखान शेख, गणेश टिळेकर, संदीप गव्हाणे, अमोल कुसाळकर, शुभांगी टिळेकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत प्रकाश बेंद्रे, मुकुंद भिवरे यांसह आदींच्या उपस्थितीत बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेत उपस्थित शेतकरी व नागरिकांना योग्य माहिती देत सदर बिबट्याच्या बछड्यांना त्यांच्या आईच्या पुनर्मिलन साठी शेतात सुरक्षित ठेवले असून परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी व रात्रीच्या वेळी शेतात फिरू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title : गन्ने के खेत में तेंदुए के बच्चे मिलने से शिरूर में हलचल!

Web Summary : शिरूर में गन्ने के खेत में दो तेंदुए के बच्चे मिलने से सनसनी फैल गई। वन विभाग ने शावकों को कब्जे में ले लिया, किसानों को सावधानी बरतने की सलाह दी।

Web Title : Leopard cubs found in sugarcane field, stir in Shirur!

Web Summary : Two leopard cubs were discovered in a Shirur sugarcane field, causing excitement. Forest department took custody of the cubs, urging caution to farmers.