Pune heatwave : पुणेकर उष्णतेमुळे हैराण, शहर बनलेय ‘हॉट स्टेशन’..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 19:04 IST2026-04-26T19:04:08+5:302026-04-26T19:04:49+5:30

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे.

Pune heatwave residents are shocked by the heat, the city has become a hot station | Pune heatwave : पुणेकर उष्णतेमुळे हैराण, शहर बनलेय ‘हॉट स्टेशन’..!

Pune heatwave : पुणेकर उष्णतेमुळे हैराण, शहर बनलेय ‘हॉट स्टेशन’..!

पुणे : शहरातील तापमान रविवारी (दि.२६) चाळिशी पार करून ४१.८ अंशावर गेले. त्यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. घरात आणि घराबाहेर पडल्यावर अंगाला उष्ण झळा झोंबत होत्या. रस्त्यावरील डांबर देखील काही भागात वितळले होते. यावरून तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आले. कधी काळी ‘हिल स्टेशन’ असलेले पुणे आता ‘हॉट स्टेशन’ बनले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. कधी नव्हे ते शहरातील तापमान चाळिशी पार जात आहे. अन्यथा यापूर्वी हा पारा चाळिशीच्या आत नोंदवला जात होता. परंतु, गेल्या एक-दोन वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात बांधकामे झाली, एसी आणि वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी शहरातील तापमान वाढताना दिसून येत आहे. राज्यभरात देखील तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोचत आहे.

रविवारी (दि.२६) शहराला उन्हाचा तडाखा बसला असून, तो अधिक तीव्र होत आहे. उष्णतेचा पारा ४१.८ अंश सेल्सिअसवर गेल्याने पुणेकरांना उन्हाच्या झळांनी नकोसे केले. शिवाजीनगरचे कमाल तापमान ४१.८ अंश नोंदवले गेले. तसेच इतर भागातील आणि जिल्ह्यातील काही गावातही हा पारा ४१ अंशावर गेला. रविवारी तर सकाळी १० वाजल्यापासूनच सूर्याचे चटके जाणवू लागले, तर दुपारच्या वेळी उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही झाली. रस्त्यांवरून चालताना उष्ण वारे थेट शरीराला लागत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.

 

दरम्यान, शिवाजीनगरच नव्हे, तर पाषाण, चिंचवड, कोरेगाव पार्क, हडपसर आणि मगरपट्टा या भागांतही कमाल तापमानात वाढ नोंदवली आहे. वाढत्या तापमानासोबतच उकाडाही कमालीचा वाढला असून, पुणेकर घामाघूम झाले आहेत. परिणामी रविवार असूनही दुपारच्या सत्रात शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

किमान तापमानही वाढले..!

शहरातील कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जात असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. हडपसरमध्ये किमान तापमान २८, तर मगरपट्टा, वडगावशेरी २७ अंशावर पोचले आहे. त्यामुळे रात्री देखील प्रचंड उष्णता जाणवत आहे. ज्या भागात प्रचंड बांधकामे सुरू आहेत, त्याच भागात किमान व कमाल तापमान वाढले आहे.

शहरातील किमान व कमाल तापमान

शिवाजीनगर : २१.५ : ४१.८

वडगावशेरी : २७.६ : ४१.२

चिंचवड : २६.६ : ४१.२

मगरपट्टा : २७.५ : ४०.९

हडपसर : २८.२ : ४०.३

बालेवाडी : २५.० : ४०.३

हवेली : २१.१ : ४०.२

पाषाण : २१.६ : ४०.१

एनडीए : २१.१ : ३९.३

पुण्यासह राज्यभरात तापमान वाढत आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. -अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

Web Title : पुणे में भीषण गर्मी, शहर बना 'हॉट स्टेशन'

Web Summary : पुणे में तापमान 41 डिग्री सेल्सियस से अधिक होने से भीषण गर्मी पड़ रही है। निर्माण, एसी उपयोग और वाहन बढ़ते तापमान का कारण हैं। न्यूनतम तापमान बढ़ने से शाम को भी राहत नहीं मिल रही है।

Web Title : Pune Suffers Intense Heatwave, Becomes a 'Hot Station'

Web Summary : Pune faces scorching heat as temperature crosses 41°C. Construction, AC use, and vehicles contribute to rising temperatures. Evenings offer no relief, with minimum temperatures also rising across the city's regions.