शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर नेमकं काय घडलं..? २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह २ दिवसांनी खोल दरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:43 IST

Pune Crime - मनीषाची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य परिसरात आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

धायरी : पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ला परिसरातून बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह अखेर खोल दरीत आढळून आला. दोन दिवस सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने रॅपलिंगच्या सहाय्याने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे सिंहगड परिसरात खळबळ उडाली आहे.अधिकच्या माहितीनुसार, मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८) असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळच्या नांदेड जिल्ह्यातील धेनेगाव येथील रहिवासी होती. सध्या ती चिंचवडमधील बिजलीनगर परिसरात वास्तव्यास होती. मनीषाने बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण पूर्ण केले होते. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी मनीषा सिंहगड परिसरात गेल्यानंतर बेपत्ता झाली. किल्ला परिसरात मनीषाची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.दरम्यान, गड परिसरातील काही स्थानिकांनी सायंकाळच्या वेळी दरीत कुणीतरी पडल्याचा आवाज ऐकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर हवेली पोलीस, सिंहगड वनविभाग, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. सलग दोन दिवस चाललेल्या  शोधकार्यानंतर अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाला खोल दरीत मनीषाचा मृतदेह आढळून आला. दोराच्या सहाय्याने, कठीण परिस्थितीत रॅपलिंग करत पथकाने मृतदेह बाहेर काढला. मनीषाने किल्ल्याच्या बुरुजावरून दरीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवेली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy at Sinhagad: Woman's Body Found in Valley After Search

Web Summary : A 28-year-old woman, Manisha Gaikwad, was found dead in a valley near Sinhagad fort after a two-day search. She went missing on April 29th. Police are investigating the cause of death, suspecting suicide.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या