शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Pune crime : एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले; ३१ लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:10 IST

pune crime - या कारची झडती घेतली, तेव्हा कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांचे २३ ग्रॅम एमडी मिळून आले.

पुणे : एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२, रा. विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाघोली पोलिस ठाण्याचे तपास पथक सातव वस्ती रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार प्रदीप मोटे, विशाल गायकवाड यांना पाहून एक जण घाईगडबडीत निघून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन योगेश कणगरे याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे १ लाख ८ हजार रुपयांचे ५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) मिळून आले. पोलिसांनी त्याच्या कारसह एमडी जप्त करून योगेश कणगरे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने एमडी पावडर ही त्याचा मित्र सोनू सिंह याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोनू सिंह याला पकडले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ४७ हजार रुपयांची ८ ग्रॅम एमडी पावडर, दुचाकी आणि मोबाइल मिळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यात घराच्या पार्किंगमध्ये एक कार होती. या कारची झडती घेतली, तेव्हा कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांचे २३ ग्रॅम एमडी मिळून आले. पोलिसांनी ती २० लाखांची कारदेखील जप्त केली. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३७ ग्रॅम एमडी, मोबाइल, दोन कार आणि दुचाकी असा ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, एपीआय विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, राहुल कोळपे, पोलिस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे आणि अमोल ढोणे यांच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Two arrested for selling MD drugs; ₹3.1 million seized

Web Summary : Pune police arrested two individuals in Wagholi for selling MD drugs, seizing ₹3.1 million worth of MD, cars, and a motorcycle. The accused are Yogesh Kanagare and Sonu Singh. The operation involved multiple police officers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र