Pune Crime आरटीओच्या दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठवून एकाला अडीच लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:39 IST2026-01-13T16:39:10+5:302026-01-13T16:39:29+5:30

पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यासंबंधी बनावट ई-चलनची एपीके फाइल पाठवून एकाची दोन लाख ६० हजार ...

Pune Crime One person was duped of Rs 2.5 lakh by sending fake invoices for RTO's penalty action; Crime against cyber thieves | Pune Crime आरटीओच्या दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठवून एकाला अडीच लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

Pune Crime आरटीओच्या दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठवून एकाला अडीच लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यासंबंधी बनावट ई-चलनची एपीके फाइल पाठवून एकाची दोन लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमधील खोपडेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यानी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ‘आरटीओ’च्या नावे दंडात्मक कारवाईच्या बनावट चलनची एपीके फाइल पाठवली.

त्याद्वारे सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइलचा ॲक्सेस घेऊन आधारकार्ड, बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करून बँक खात्यातून दोन लाख ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत. 

Web Title : पुणे: फर्जी आरटीओ ई-चालान से एक व्यक्ति को 2.6 लाख रुपये का चूना।

Web Summary : पुणे के एक निवासी को फर्जी आरटीओ ई-चालान एपीके फाइल मिलने के बाद 2.6 लाख रुपये का नुकसान हुआ। साइबर अपराधियों ने उसके फोन तक पहुंच बनाई, व्यक्तिगत डेटा चुराया और उसके बैंक खाते से पैसे निकाल लिए। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Pune: Fake RTO e-challan scam dupes man of ₹2.6 lakhs.

Web Summary : A Pune resident lost ₹2.6 lakhs after receiving a fake RTO e-challan APK file. Cybercriminals accessed his phone, stole personal data and siphoned funds from his bank account. Police are investigating the fraud.