पुणे : वाहतूक नियम मोडल्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे. पोलिस हवालदार अंकुश रामा पवार आणि पोलिस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे, अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांनी चौकात थांबावे, चौकाच्या एका बाजूला जाऊन थांबलेले दिसले तर कारवाई करू, असा इशारा दिला होता. तरीही वाहतूक पोलिस चौकाच्या बाजूला उभे राहून वाहन चालक कधी नियम तोडतो हे पाहत उभे असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून पोलिस नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे घेताना दिसून आले होते.
पोलिस हवालदार अंकुश रामा पवार, पोलिस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे, मनोज पांडुरंग बदडे यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या अनुषंगाने जबाब नोंदवण्यात आला. सहकारनगर वाहतूक विभागातील हवालदार पवार, रामगडे यांना १९ एप्रिल २०२६ रोजी शारदा आर्केड या चौकामध्ये वाहतूक नियमन कर्तव्यासाठी नेमण्यात आले होते. या चौकातील ज्या वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली. त्यांच्यावर योग्य ती कारवाई न करता
दोन वाहन चालकांकडून १५० रुपये, तर अन्य एका वाहन चालकाकडून २०० रुपये ऑनलाइन स्वरूपात दुसऱ्याच्या स्कॅनरवर घेतल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम अधिकृत दंडाऐवजी थेट स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कर्तव्यावर असताना बेशिस्त, बेजबाबदार आणि पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत दोघांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
Web Summary : Two Pune traffic police officers were suspended for accepting bribes from traffic violators instead of issuing legal fines. They were caught on video accepting money via online scans. The officers are accused of damaging the police department's reputation.
Web Summary : पुणे के दो ट्रैफिक पुलिस अधिकारियों को ट्रैफिक नियम तोड़ने वालों से रिश्वत लेने के आरोप में निलंबित कर दिया गया है। वीडियो में वे ऑनलाइन स्कैन के माध्यम से पैसे लेते हुए पकड़े गए। अधिकारियों पर पुलिस विभाग की छवि खराब करने का आरोप है।