शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : पुणे हादरलं..! घरगुती वादातून बापानेच ३० वर्षीय मुलावर फेकलं ॲसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 16:54 IST

Crime News : आरोपी व त्याचा अंदाजे ३० वर्षीय मुलगा यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद सुरू होता.

पुणे - कोथरूड परिसरातील केळेवाडी येथे घरगुती वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापाच्या भरात एका बापाने स्वतःच्या मुलावर ॲसिड फेकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकच्या माहितीनुसार, आरोपी व त्याचा अंदाजे ३० वर्षीय मुलगा यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्यानंतर संतापलेल्या वडिलांनी मुलाच्या अंगावर ॲसिड फेकल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीररीत्या भाजला गेला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला आणि हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ॲसिड कुठून आणले, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे केळेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Shocker: Father Throws Acid on Son After Domestic Dispute

Web Summary : In Pune's Kothrud, a father threw acid on his 30-year-old son following a heated domestic argument. The son is critically injured and hospitalized. Police have arrested the father and are investigating the incident, which has caused outrage in the Kelewadi area.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र