धनकवडी : आंबेगाव बुद्रुक परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनेने सासूचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुमन शिंदे (वय ८६) असे असून आरोपी सुनेचे नाव अनुपमा संजय शिंदे (वय ६०) आहे. दोघीही आंबेगाव बुद्रुक येथील समृद्धी रेसिडेन्सीमध्ये राहत होत्या. मंगळवारी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणांवरून सासू-सुनेमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी अनुपमा शिंदे यांनी घरातील आपल्या सुनेला बेडरूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरातील चाकू घेत वृद्ध सासू सुमन शिंदे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात सुमन शिंदे यांच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सुमन शिंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अनुपमा शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A 60-year-old woman in Ambegaon Budruk fatally stabbed her 86-year-old mother-in-law following a heated domestic argument. The accused locked her own daughter in law in a room before attacking the victim with a kitchen knife. Police have arrested the suspect and are investigating the case.
Web Summary : अंबेगांव बुद्रुक में घरेलू झगड़े के बाद एक 60 वर्षीय महिला ने अपनी 86 वर्षीय सास की चाकू से हत्या कर दी। आरोपी ने अपनी ही बहू को कमरे में बंद कर दिया, फिर रसोई के चाकू से सास पर हमला किया। पुलिस ने संदिग्ध को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच कर रही है।