पुणे : लग्नसमारंभातील मेहंदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला शस्त्राचा धाक दाखवून पाच लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
संतोष काची, यश काची (रा. ममतानगर, सांगवी, पिंपरी-चिंचवड), दत्ता रघुनाथ चव्हाण (रा. वारजे), सुशील सूर्यकांत गौड (रा. पाटील इस्टेट, जुना मुंबई-पुणे रस्ता) आणि यश दीपक सावंत (रा. जुनी सांगवी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी २७ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. आरोपी आणि फिर्यादी हे ओळखीचे आहेत. आरोपींनी त्यांना कार्यक्रमात शिवीगाळ करून शस्त्राचा धाक दाखवला व फिर्यादीच्या गळ्यातील पाच लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यांना मारहाण करुन आरोपी पसार झाले. घाबरलेल्या काची यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पसार आरोपींना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिथुन सावंत करत आहेत.
Web Summary : In Yerwada, a gang robbed a man of a gold chain worth ₹5 lakhs during a Mehndi ceremony. Laxminagar police arrested five individuals for the robbery after the victim filed a complaint. Further investigation is underway.
Web Summary : येरवड़ा में, एक गिरोह ने मेहंदी समारोह के दौरान एक व्यक्ति से ₹5 लाख की सोने की चेन लूट ली। लक्ष्मीनगर पुलिस ने शिकायत दर्ज होने के बाद पांच लोगों को गिरफ्तार किया। आगे की जांच जारी है।