शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रकरणात डॉक्टरवर ठपका; चार लाखांच्या धनादेशामुळे वाढला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:30 IST

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रकरणात डॉक्टरांवर ठपका, चार लाखांच्या धनादेशाने संशय वाढला

- दुर्गेश मोरे 

पुणे : रंजना केसकर मृत्यू प्रकरणात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. अनिल कदम यांच्यावर चौकशी समितीने प्राथमिक अहवालात ठपका ठेवला आहे; तर दुसरीकडे नियमबाह्य पद्धतीने केसकर यांच्या नातेवाइकांना तब्बल चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. नेमके हे पैसे कशासाठी देण्यात आले, हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, इतकी गंभीर घटना असतानाही केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रजा देण्यात आली. एकूण बेजबाबदारपणामुळेच केसकर यांचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांतून सुरू होऊ लागली आहे.

केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना रंजना केसकर या महिलेचा रक्तस्रावामुळे २५ एप्रिलला मृत्यू झाला. विशेष म्हणजे केसकर यांचा रक्तस्राव थांबत नसल्याचे माहीत असतानादेखील डॉ. अनिल कदम हे तेथून पुढील शिबिरासाठी निघून गेले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा लोखंडे यांनी केसकर यांना तत्काळ वरंवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ससूनमध्ये नेण्यात आले. हे सर्व करत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ वरिष्ठांना तोंडी सांगून नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले. नातेवाइकांनाच रुग्णवाहिकेसह खासगी दवाखान्याचे बिल भरण्यास सांगितले. प्रकरण अंगलट येताच त्यांनी पैसे परत केले. एवढे सगळे होऊनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बक्षीस म्हणून रजा मंजूर केली. नियमानुसार संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी केडगावला राहणे अपेक्षित आहे; परंतु, त्या पुण्यात राहत असल्याने त्यांना आरोग्य केंद्र सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू झाली आहे. केडगाव प्रकरणाच्या तपासासाठी पाचजणांची चौकशी समिती नेमली होती. तब्बल १० दिवसांनंतर या समितीने प्राथमिक अहवाल देत डॉ. अनिल कदम यांच्यावर ‘शस्त्रक्रिया झाल्यानंतरही रक्तस्राव सुरू होता,’ असा ठपका ठेवला आहे. हे सर्व घडत असताना नियमबाह्य पद्धतीने केसकर कुटुंबीयांना तब्बल चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. हा धनादेश चक्क प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकेच्या पतीने दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नमके हे पैसे कशासाठी दिले, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. 

तीन जिल्ह्यात डॉ. कदम यांना काम करण्यास बंदी

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना रंजना केसकर यांचा मृत्यू रक्तस्रावामुळे झाला आहे हे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही, तर हे माहीत असतानाही डॉ. कदम हे तेथून पुढील शिबिरासाठी निघून गेले. केसकर यांना वरवंड येथील खासगी रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. कदम यांना त्या ठिकाणी बोलावले. त्यानुसार कदम तेथे आले, परिस्थिती पाहिली आणि निघून गेले. इतके सर्व होऊनही डॉक्टर कदम यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु, प्रकरण चांगलेच तापत असल्याचे लक्षात येताच त्यांना पाठीवरचा हात काढल्याची चर्चा प्रशासनामध्ये रंगली आहे. दरम्यान, डॉ. अनिल कदम हे सातारा, सांगली आणि पुणे येथील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करतात. मात्र, केसकर प्रकरणामुळे या तीनही जिल्ह्यांत डॉ. कदम यांना काम करण्यास बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबतचा अहवालही वरिष्ठांकडे पाठवला असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. 

अनिल कदम यांच्यावर गंभीर आरोप

सन २०१७ सातारा जिल्ह्यातील तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात नेमलेल्या समितीने त्यांच्यावर गंभीर आणि निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. आंतररुग्णाच्या व्यवस्थित नोंदी न ठेवणे, एमपीटी किट खरेदी करताना विहित पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येत नाही, त्याबाबत त्यांनी समितीसमोर कबुलीही दिली आहे. याशिवाय अन्य काही गोष्टी अहवालात नमूद आहे. हा अहवाल आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. मात्र, हा अहवाल तेथे धूळ खात पडला आहे. २०१७ मध्ये सातारा जिल्ह्यात आरोग्याधिकारी असणारे डॉ. भगवान पवार हे सध्या आरोग्य विभागाचे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. कदम यांच्याविरोधात धूळ खात पडलेला अहवाल आणि केडगाव प्रकरणाच्या अहवालावर डॉ. पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

असंवेदनशीलतेचा कळस

रंजना केसकर यांचा मृत्यू होऊन ११ दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणीही केसकर कुटुंबीयांना भेटायला गेलेले नाहीत. एकीकडे माॅडेल पीएचसीचा डंका वाजवत असताना दुसरीकडे पीएचसीमध्येच बेजबाबदारपणामुळे मृत्यू होतो; पण वरिष्ठांकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. उलट घटना घडल्यापासून डॉ. अनिल कदम यांचे नातेवाईक केसकर कुटुंबाच्या संपर्कात आहेत. एकूणच हा असंवेदनशीलतेचा कळसच असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Negligence in Kedgaon Sterilization Case; Suspicion Increased by Check

Web Summary : In Kedgaon, a woman died after a sterilization surgery. A doctor is blamed, and a suspicious payment of ₹4 lakh was made to the family. Investigations are ongoing into alleged negligence and procedural lapses.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या