काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:11 PM2021-03-08T23:11:12+5:302021-03-08T23:11:52+5:30

जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक असलेले रुग्ण जानेवारीपर्यंत कमी झाले होते. परंतु,  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.  (Pune CoronaVirus Update)

Pune CoronaVirus Update : Number of containment zones in Pune rises to 62, while 9 'hotspots' | काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’

काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’

googlenewsNext

पुणे- शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून गेल्याच आठवड्यात ४२ सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र (containment zones) घोषित करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये आणखी २० सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांची भर पडली असून एकूण संख्या ६२ झाली आहे. पालिकेच्या १५ पैकी ११ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन औंध-बाणेरमध्ये असून सर्वाधिक ‘हॉटस्पॉट’ (hotspots) शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत. (Pune CoronaVirus Update : Number of containment zones in Pune rises to 62, while 9 hotspots)

जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक असलेले रुग्ण जानेवारीपर्यंत कमी झाले होते. परंतु,  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.  त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्याठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, अशा ठिकाणांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ लागले आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात करण्यात आली असून याठिकाणी फलक लावणे, आवश्यकतेनुसार बॅरिकेटस लावण्यात येत आहेत.

क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आणि हॉटस्पॉट क्षेत्रीय कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र 
औंध-बाणेर - १९  -- 
शिवाजीनगर - ०८  ०४
 कोंढवा-येवलेवाडी - ०८  ००
हडपसर-मुंढवा - ०७  --
कसबा-विश्रामबाग - ०६  ०३ 
नगररस्ता - ०५  ०१ 
बिबवेवाडी - ०५  -- 
वारजे - ०३  ०१ 
भवानी पेठ - ०१  -- 
एकूण - ६२  ०९

Web Title: Pune CoronaVirus Update : Number of containment zones in Pune rises to 62, while 9 'hotspots'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.