Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:40 IST2025-10-07T10:39:43+5:302025-10-07T10:40:01+5:30
Pune Water Cut News: शुक्रवारी (दि.१०) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे

Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
पुणे : महापालिकेची विविध जलकेंद्रे व टाक्या येथील तातडीची व विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या गुरुवारी (दि. ९) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.१०) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
महापालिकेचे नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत येणारी पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एम.एल.आर. टाकी परिसर, चतु:शृंगी टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल, वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. एच.एल.आर. चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र, जीएसआर टाकी परिसर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र आदी ठिकाणची विद्युत पंपिंग आणि वितरण व्यवस्थेसंदर्भात तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी महावितरणच्या वारजे विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.९) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.