शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune Airport News - कोणतीही हानी नाही; विमानतळ व्यवस्थापन पूर्णपणे अलर्ट मोडवर - मुरलीधर मोहोळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:54 IST

Pune Airport News - पुणे विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात; धावपट्टी ९ तास बंद, ३० हून अधिक उड्डाणांवर परिणाम 

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे लोहगाव विमानतळाची धावपट्टी तब्बल ९ तास बंद ठेवावी लागली. या घटनेचा थेट परिणाम विमान वाहतुकीवर झाला असून, पुण्याकडे येणारी आणि येथून उड्डाण करणारी ३० हून अधिक विमाने रद्द किंवा अन्यत्र वळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.दरम्यान, या घटनेनंतर  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलतांना  सांगितले की, सुदैवाने, विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

नेमकी घटना काय?भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानाचे लँडिंगदरम्यान अंडरकॅरेज (लँडिंग गिअर) मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचे हार्ड लँडिंग झाले आणि ते धावपट्टीच्या मध्यभागी अडकून पडले. SATCO आणि IAF यांच्या माहितीनुसार, विमान हालचाल करण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र, दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. धावपट्टी बंद आणि पुन्हा सुरू-रात्री १०:२५ वाजता घटना घडली-NOTAM जारी करून धावपट्टी सकाळी ०५:३० पर्यंत बंद-नंतर वेळ वाढवून ०९:०० पर्यंत बंद ठेवली-सकाळी ०५:४५ वाजता विमान हटवण्यात आले---प्रस्थान उड्डाणे:०७:३० पासून सुरूआगमन उड्डाणे: ०८:०० पासून सुरूयानंतर धावपट्टी सुरक्षित घोषित करण्यात आली आणि उड्डाण सेवा पुन्हा सुरळीत झाली.-----उड्डाणांवर परिणामवळवलेली उड्डाणे:IndiGo – ८Air India – १Akasa Air – १Air India Express – २----रद्द उड्डाणे:IndiGo: ३५ आगमन, ३८ प्रस्थानAir India: ३ आगमन, ३ प्रस्थानSpiceJet: २ आगमन, ३ प्रस्थानAkasa Air: २ आगमन, ३ प्रस्थानAir India Express: ५ आगमन, ५ प्रस्थान-------प्रवाशांसाठी सुविधाप्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करून पिण्याचे पाणी, चहा, कॉफी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. CISF आणि AAI च्या टीमने व्यवस्थापन सुरळीतपणे हाताळले.---------उड्डाण सेवा पुन्हा सुरूपहिले आगमन उड्डाण (Mopa वरून Fly91): ०८:५८पहिले प्रस्थान उड्डाण (SpiceJet 937 ते दिल्ली): ०९:१७सध्या विमानतळावरील सेवा पूर्णपणे सुरळीत झाली आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांशी समन्वय साधून उशीर, रद्दीकरण आणि वळवलेल्या उड्डाणांबाबत माहिती दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Airport Alert After Fighter Jet Incident; No Casualties Reported

Web Summary : A fighter jet incident at Pune Airport caused runway closure and flight disruptions. Thankfully, both pilots are safe, and there were no casualties. Operations resumed after nine hours. Passengers faced inconvenience due to cancellations and diversions. Airport authorities provided assistance.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAirportविमानतळmurlidhar moholमुरलीधर मोहोळ