Video: वनाज चौकात थरार; बसची कचरा गाडीला धडक, कामगार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:24 IST2026-04-24T15:23:51+5:302026-04-24T15:24:14+5:30

ही बस पौड रस्त्यावरून वेगात जात असताना अचानक ब्रेक फेल झाला.

Pune Accident Terrible accident at Vanaj Chowk; Bus hits garbage truck, worker seriously injured | Video: वनाज चौकात थरार; बसची कचरा गाडीला धडक, कामगार गंभीर जखमी

Video: वनाज चौकात थरार; बसची कचरा गाडीला धडक, कामगार गंभीर जखमी

पुणे -  पुण्यातील वनाज चौक परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. पीएमपीएमएल (PMPML) बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने समोर असलेल्या महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाला जोरदार धडक दिली.



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस पौड रस्त्यावरून वेगात जात असताना अचानक ब्रेक फेल झाला. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बसने पुढे असलेल्या कचरा गाडीला पाठीमागून धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कचरा गोळा करणारा एक कामगार वाहनावरून थेट रस्त्यावर फेकला गेला.

जखमी कामगाराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात हलवले. दरम्यान, संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. बसच्या तांत्रिक बिघाडाबाबत अधिक चौकशी केली जात आहे. 

Web Title : पुणे के वनाज चौक पर भीषण दुर्घटना; कर्मचारी गंभीर रूप से घायल

Web Summary : पुणे के वनाज चौक में एक पीएमपीएमएल बस दुर्घटना में एक सफाई कर्मचारी गंभीर रूप से घायल हो गया। ब्रेक फेल होने के कारण बस कचरा ट्रक से टकरा गई। घायल कर्मचारी का इलाज चल रहा है, और पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Major Accident at Vanaz Chowk, Pune; Worker Seriously Injured

Web Summary : A PMPML bus accident in Pune's Vanaz Chowk left a sanitation worker critically injured after a brake failure caused the bus to collide with a garbage truck. The injured worker is receiving treatment, and police are investigating the incident.