शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; बारामतीतील दांपत्याचा जागीच मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:57 IST

हुबळी जवळ बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास एका ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने जगताप यांची कार ट्रकवर जाऊन आदळली आणि भीषण अपघात झाला.

बारामती -  तिरुपती येथून देवदर्शन करून परतीच्या वाटेवर येत असताना बारामती शहरातील जगताप कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी (दि. ३०) पहाटे हुबळीजवळ झालेल्या अपघातात जगताप दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच जगताप दांपत्याच्या मुलांना गंभीर दुखापत झाली आहे.अनिल सदाशिव जगताप (वय ५०), वैशाली सदाशिव जगताप (वय ४५) तसेच त्यांची मुले अथर्व (वय २४) व अक्षता (वय २०) हे चौघेजण सोमवारी (दि. १) तिरुपती येथे अन्य नातेवाइकांसह दोन वाहनांमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. तिरुपती येथे देवदर्शन उरकून जगताप कुटुंबीय परतीच्या वाटेवर होते. मंगळवारी (दि. २) रात्री १०.३० च्या सुमारास जगताप कुटुंबीय आणि अन्य नातेवाइकांनी बेंगळुरू येथे जेवण केले. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले असताना हुबळी जवळ बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास एका ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने जगताप यांची कार ट्रकवर जाऊन आदळली आणि भीषण अपघात झाला.पाठीमागून दुसऱ्या कारमधून आलेल्या त्यांच्या नातेवाइकांनी स्थानिकांच्या व महामार्ग पोलिसांच्या मदतीने सर्वांना हुबळी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात वैशाली जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या अनिल जगताप यांना रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचेही निधन झाले. त्यांच्या दोन्ही मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.बारामती एमआयडीसीतील एका बड्या कंपनीत अनिल जगताप हे प्रोजेक्ट टीमचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी वैशाली या इंजिनीयर असून कॉम्प्युटर व्यवसाय सांभाळत होत्या. मुलगा अथर्व वैमानिक प्रशिक्षण घेत आहे, तर मुलगी अक्षता आयटी इंजिनिअर असून पुण्यातील एका कंपनीत नोकरी करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati family dies in tragic accident after Tirupati pilgrimage.

Web Summary : A Baramati couple died in a tragic accident near Hubli while returning from Tirupati. Anil Jagtap and Vaishali Jagtap died, while their children, Atharva and Akshata, were seriously injured. The accident occurred when their car collided with a truck. The children are receiving treatment.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात