Pune: अभाविपच्या कार्यालयाला मनविसेने लावले कुलूप; वाडिया महाविद्यालयातील प्रकाराने चिघळला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:08 IST2025-10-14T10:07:53+5:302025-10-14T10:08:37+5:30
मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही

Pune: अभाविपच्या कार्यालयाला मनविसेने लावले कुलूप; वाडिया महाविद्यालयातील प्रकाराने चिघळला वाद
पुणे: वाडिया महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटनाच्या ठिकाणीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पोस्टर लावण्यात आल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी (दि. १३) वाद निर्माण झाला. याबाबत मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मनविसेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
यापूर्वीही मनविसेच्या कॅम्पस कनेक्ट उपक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पोस्टर प्रदर्शित करून, इतर विद्यार्थी संघटनांना दुय्यम लेखण्याचा प्रयत्न केला हाेता. तक्रारीला पोलिसांकडून दाद मिळाली नसल्याने मनविसेच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील अभाविपच्या मुख्य कार्यालयात पोस्टर प्रदर्शित करून, त्याला कुलूप ठोकले, अशी माहिती मनविसेच्या कार्यकर्त्यांनी दिली. दुसरीकडे स्वत:चे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाटी स्टंटबाजी करणाऱ्या मनविसेचा निषेध करणारे पत्रक अभाविपच्या पुणे महानगर कार्यालयाने काढले आहे. या प्रकाराबाबत पुणे पोलिस आयुक्तांसमोर बाजू मांडण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी पुण्यात येत असल्याची माहिती मनविसेकडून देण्यात आली.