शौचालयांची खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था; इंदापूर बसस्थानकाच्या अस्वच्छतेवर परिवहन मंत्र्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:55 IST2026-04-30T18:53:43+5:302026-04-30T18:55:31+5:30

पुढील भेटीत परिस्थिती बदललेली दिसली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा सरनाईक यांनी दिला

Poor condition of toilets, poor condition of drinking water; Transport Minister angry over the cleanliness of Indapur bus stand | शौचालयांची खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था; इंदापूर बसस्थानकाच्या अस्वच्छतेवर परिवहन मंत्र्यांचा संताप

शौचालयांची खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था; इंदापूर बसस्थानकाच्या अस्वच्छतेवर परिवहन मंत्र्यांचा संताप

इंदापूर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ( दि.३०) अचानक इंदापूर एस.टी.बसस्थानकास भेट दिली. स्थानकावरील अस्वच्छता व प्रवाशांची गैरसोय पाहिल्यानंतर आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना फैलावर घेत, परिस्थिती बदल झाला नाही तर थेट व कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
    
धाराशिवकडे जात असताना इंदापूर येथे थांबून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानकच बसस्थानकाची बारकाईने पाहणी केली. या पाहणीत शौचालयांची अत्यंत खराब स्थिती, पिण्याच्या पाण्याची अपुरी व अस्वच्छ व्यवस्था, हिरकणी कक्षातील निष्काळजीपणा, चौकशी कक्षातील तुटलेली काच, व्यापारी गाळ्यांची अतिक्रमणे निदर्शनास आल्यानंतर ते संतप्त झाले. या भेटीत प्रवाशांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
    
यावेळी उपस्थित असणाऱ्या आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी व स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांना 'बसस्थानक म्हणजे प्रवाशांसाठीचे पहिले सेवा केंद्र आहे. येथेच अशी घाण दिसत असेल, तर प्रशासन नेमकं काय करते आहे असा जाब विचारला. बसस्थानकाच्या परिसराची तात्काळ स्वच्छता करावी. संपूर्ण व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावेत असा आदेश दिला. पुढील भेटीत परिस्थिती बदललेली दिसली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट व कडक कारवाई केली जाईल',असा सज्जड इशारा ही त्यांनी दिला.

Web Title : इंदापूर बस स्टैंड की दुर्दशा पर मंत्री सरनाईक नाराज।

Web Summary : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने औचक निरीक्षण के दौरान इंदापूर बस स्टैंड पर खराब स्वच्छता, अपर्याप्त पेयजल और कुप्रबंधन पर नाराजगी व्यक्त की। उन्होंने अधिकारियों को सुधार न होने पर सख्त कार्रवाई की चेतावनी दी।

Web Title : Minister Sarnaik Angered by Indapur Bus Stand's Poor Conditions.

Web Summary : Transport Minister Pratap Sarnaik, during a surprise visit, expressed anger at the Indapur bus stand's poor sanitation, inadequate drinking water, and overall mismanagement. He warned officials of strict action if improvements aren't made.