पोलीस पाटलांनी गृहमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST2021-06-16T04:14:52+5:302021-06-16T04:14:52+5:30

पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळांनी पोलीस पाटलांच्या विविध समस्यांबाबत आणि मागण्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या वेळी मागण्यांविषयी ...

Police Patil lodged a complaint with the Home Minister | पोलीस पाटलांनी गृहमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

पोलीस पाटलांनी गृहमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे

पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळांनी पोलीस पाटलांच्या विविध समस्यांबाबत आणि मागण्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या वेळी मागण्यांविषयी वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मंत्रालयात बैठक लावून मागण्या मार्गी लावल्या जातील तसेच मानधनवाढ संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक लावून तुम्हाला निमंत्रित केले जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

या वेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळभोर, आंबेगाव तालुका अध्यक्ष रवींद्र विश्वासराव, हवेली तालुकाध्यक्ष पंडितराव हरगुडे, महिला आघाडी कार्याध्यक्षा रोहिणी हांडे, खेड तालुका कार्याध्यक्ष अमोल पाचपुते उपस्थित होते.

-

फोटो क्रमांक : १५ राजगुरुनगर पोलीस पाटील

फोटो ओळ: पोलीस पाटलांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

Web Title: Police Patil lodged a complaint with the Home Minister