शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

पुण्यातील दोघा जणांना राष्ट्रपती ‘पोलीस पदक’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 9:18 PM

राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या आणि ग्रामीण पोलिसांच्या प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

पुणे  : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राष्ट्रीय पोलीस पदकांची घोषणा केली असून यामध्ये राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या आणि ग्रामीण पोलिसांच्या प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे शाखेचे सहायक पोलीस फौजदार प्रदीप ऊर्फ बापू हरिश्चंद्र जांभळे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्द्ल पोलीस पदक जाहिर झाले आहे. जांभळे १९८७ साली पुणे शहर पोलीस दलामध्ये भरती झाले. त्यांनी सहकारनगर, सांगवी, खडकी पोलीस ठाण्यांसह विशेष शाखा, गुन्हे शाखा येथे काम केले आहे. त्यांनी आजवर २१ लाख ९० हजारांचे तब्बल १०१ बेकायदा अग्निशस्त्र व १३८ जिवंत काडतुसे पकडली आहेत. विविध गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यासोबतच दहशतवादी कट करुन आयएसआयकरिता काम करणाऱ्या पाच बांग्लादेशींना पकडण्यात सहभाग घेतला. तसेच ५२ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करुन मोठी कारवाई केली आहे. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या अल्पवयीन ७० आणि सज्ञान १४० मुलींची सुटका करुन ८० आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत ३२८ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना २००९ साली पोलीस महासंचालकांचे पदक मिळालेले आहे.तर पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या दशरथ बाबुराव चिंचकर यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेबद्द्ल पोलीस पदक जाहिर झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGovernmentसरकार