चौघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

By Admin | Updated: May 26, 2014 05:22 IST2014-05-26T05:22:41+5:302014-05-26T05:22:41+5:30

रावेत येथील हॉटेल व्यवस्थापकाचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या चार आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारपर्यत पोलसि कोठडी सुनावली आहे

Police detain four to Friday | चौघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

चौघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

किवळे : रावेत येथील हॉटेल व्यवस्थापकाचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या चार आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने शुक्रवारपर्यत पोलसि कोठडी सुनावली आहे. यातील चार आरोपी अद्याप फरार आहेत. रावेत येथील शिवनेरी हॉटेलचे व्यवस्थापक विनायक दत्तोबा शिंदे (वय ३५) यांचा शुक्रवारी ( दि. २३ ) रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी भोसरीतील कॉँग्रेस नगरसेवक जालिंदर शिंदे यांच्यासह कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर आणि विशाल टिंगरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र हे सर्व आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शनिवारी रात्री चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साई ऊर्फ कौशल रामचंद्र विश्वकर्मा ( वय २२, रा. गव्हाणे वस्ती , भोसरी ), बापू ऊर्फ प्रदीप दत्तात्रय गाढवे ( वय २१, रा. गुळवेनगर, भोसरी ), संतोष ऊर्फ रुपेश सुरेश पाटील ( वय २४ रा. गवळीनगर, भोसरी ), राहुल मोहन करंजकर ( वय २२ , रा. आळंदी ता. खेड ) अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. त्यांना वडगाव न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या खून प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता हे लवकरच तपासात निष्पन्न होईल. तसेच खूनप्रकरणातील नगरसेवक शिंदे याच्यासह चारही फरारी आरोपींना पकडण्यासाठी चार पथके मागावर असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरु असल्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Police detain four to Friday