शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Police Bharti 2021: राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ४४४ परीक्षा केंद्र; ११ हजार पोलिसांचा बंदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 19:00 IST

परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली.

पिंपरी : पोलीस शिपाई पदासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा आयोजित केली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये ४४४ परीक्षा केंद्र राहणार असून, ११ हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात केला आहे. तसेच परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर केले. त्यातील पात्र ठरलेल्या १९०३१९ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली. 

दोन तास आधीच केंद्रावर हजर रहावे लागणार

लेखी परीक्षा शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे. परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र, आवश्यक आहे. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे. 

पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस, असे चार जणांचा या प्रत्येक पथकात समावेश राहणार आहे. परीक्षा सुरू असताना हे पथक पाहणी करणार आहे. 

बहुतांश परीक्षा केंद्र हे शहरातच आहेत. काही केंद्र शहरालगत आहेत. परीक्षार्थींना प्रवास आदीबाबतीत सोयीचे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षार्थींनी वेळेत केंद्रावर पोहचावे. 
- डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड 

असे आहेत परीक्षा केंद्र

शहर - केंद्र - परीक्षार्थी
नागपूर - ४७ - २४९९४
नाशिक - ३१ - १३८००
औरंगाबाद - ७७ - २१७२३
सोलापूर  - २५ - ११८७८
अहमदनगर - ४७ - १७०६८
पुणे - २१७ - १००८५६

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसexamपरीक्षाEducationशिक्षण