शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:30 IST

अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

पुणे - महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. त्यातच पुण्यात मोठी घडामोड घडली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी डिझाईन बॉक्सच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. मात्र अचानक ही कारवाई का करण्यात आली याबाबत कारण पुढे आले नाही.

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि अजित पवारांची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यातच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी क्राइम ब्रांचकडून नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. अरोरा यांची डिझाईन बॉक्स कंपनी ही लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे काम करते. अजित पवारांच्या प्रचारसभांपासून सर्व रणनीती आखण्यात या कंपनीची पडद्यामागून भूमिका असते. या डिझाइन बॉक्सच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिमा जनमानसात बदलण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे. या डिझाइन बॉक्सच्या कार्यालयात पुणे क्राइम ब्रांचच्या पथकाने जाऊन काही कागदपत्रांची पडताळणी केली आहे. मात्र निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही कारवाई होणं यामागे बरेच अर्थ काढले जात आहेत. 

अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ, महेश लांडगे यासारख्या नेत्यांवर वैयक्तिक टीकाही केली आहे. अजित पवारांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला कोंडीत पकडण्याचं काम केले. मात्र पक्षाच्या त्या मागच्या धोरणात्मक रणनीतीत महत्त्वाची भूमिका डिझाइन बॉक्सची होती. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयावर जाऊन जर पोलीस कारवाई करत असतील नक्कीच अजित पवारांनी निवडणुकीत जो प्रचार केलेला आहे त्या प्रचाराला या कारवाईशी जोडलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना क्राइम ब्रांचने अशाप्रकारे का कारवाई केली हे कळत नाही. सांगोल्यातही शहाजी पाटील यांच्या ठिकाणी अशीच कारवाई निवडणुकीपूर्वी केली मात्र तिथे जनतेने उत्तर दिले. त्यामुळे या कारवाईमागे कुणाचे कारस्थान आहे का, यामागचा मास्टरमाइंड कोण हे आम्ही १६ तारखेनंतर सांगू. पोलिसांनी त्यांची कारवाई केली त्यात हरकत नाही. कर नाही त्याला डर कशाला...ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी असं कुभांड केलंय का त्याचे उत्तर १७ तारखेला देऊ. ही कारवाई वरून साधी सोपी वाटत असली तरी त्यामागे राजकीय किनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's political advisor's office raided amid Pune election heat.

Web Summary : Pune police raided Design Box, owned by Ajit Pawar's advisor, Naresh Arora, on the election's last day. The company manages Pawar's campaigns and image. NCP suspects political motives behind the raid, linking it to Pawar's recent corruption allegations against BJP leaders during the election campaign.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारBJPभाजपा